Bee Attack on Cricket Match : क्रिकेट सामन्यात मधमाशांचा हल्ला!, १० मिनिटांत ५० हून अधिक मधमाशांनी 'डंख' दिल्याने ‘अम्पायर’चा मृत्यू

cricket match bee attack umpire death : मधमाशांच्या या हल्ल्यात १५-२० खेळाडूंसह आणखी एक पंच आणि मैदानातील कर्मचारी जखमी झाले आहेत.
A shocking scene from a cricket match in Unnao where a swarm of bees attacked players and officials, resulting in the tragic death of an umpire after multiple stings.

A shocking scene from a cricket match in Unnao where a swarm of bees attacked players and officials, resulting in the tragic death of an umpire after multiple stings.

esakal

Updated on

Unnao Cricket Match Bee Attack : उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात बुधवारी शुक्लागंज येथील सप्रू स्टेडियममध्ये सुरू असलेल्या अंडर-13 क्रिकेट लीग सामन्यावर मधमाश्यांच्या झुंडीने अचानक हल्ला केल्याची एक भयानक घटना घडली.

एवढंच नाहीतर या हल्ल्यात वरिष्ठ कानपूर क्रिकेट असोसिएशन (केसीए) पंच माणिक गुप्ता यांचा मृत्यू झाला, तर १५-२० खेळाडू, आणखी एक पंच आणि मैदानातील कर्मचारी जखमी झाले.

 मैदानाच्या सीमा भिंतीला लागून असलेल्या एका वडाच्या झाडावर मधमाशांचे पोळे होते. या ठिकाणी सकाळपासूनच मधमाश्या घिरट्या घालत होत्या. दरम्यान क्रिकेट सामन्यातील खेळाडूंच्या ड्रिंक्स ब्रेकच्या वेळी अचानक मैदानावर मधमाशांच्या झुंडीने शिरकाव केला. यामुळे सर्वांची एकच पळापळ झाली.

A shocking scene from a cricket match in Unnao where a swarm of bees attacked players and officials, resulting in the tragic death of an umpire after multiple stings.
Epstein Files Impact : ‘एपस्टीन’चा दणका!, ब्रिटनचे माजी प्रिन्स अँड्र्यू माउंटबॅटन यांना अटक

 खेळाडू, पंच आणि इतरजण धावत सुटले. तर  काहीजण जमिनीवर पडले, काहीजण तर काही मैदानावरील बाथरूममध्ये लपले. पण माणिक गुप्ता मैदानाजवळच बसलेले होते, नंतर तेही आश्रयासाठी धावत असताना खाली पडले आणि  त्यानंतर ५० हून अधिक मधमाश्यांनी त्याला घेरले आणि सुमारे १० मिनिटे सतत त्यांना डंख मारले.

A shocking scene from a cricket match in Unnao where a swarm of bees attacked players and officials, resulting in the tragic death of an umpire after multiple stings.
Google Investment : गुगल भारतात १.३५ लाख कोटींची गुंतवणूक करणार ; अमेरिकेपर्यंत समुद्राखाली केबल टाकणार

त्याच्या संपूर्ण शरीरावर मधमाशांच्या डंखाच्या खुणा होत्या. परिणामी त्यांना ताताडीने रूग्णालयात हलवले मात्र वाढत्या वयामुळे आणि हृदयरोगामुळे त्यांची प्रकृती झपाट्याने बिघडली आणि त्यांचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com