उन्नाव : दलित तरुणीची हत्या करून मृतदेह पुरला; माजी मंत्र्याच्या मुलावर आरोप

मृत तरुणीचा मृतदेह एका आश्रमातील सेप्टि टँकमध्ये आढळला.
Unnao
Unnao Team eSakal

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) उन्नावमध्ये (Unnao) पुन्हा एक भयावह घटना घडल्याचं समोर आलं आहे. दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या एका दलित मुलीची हत्या करून शहरातील एका आश्रमाच्या परिसरातील सेप्टि टँकमध्ये तिचा मृतदेह पुरण्यात आल्याचं समोर आलं आहे. धक्कादाय म्हणजे या घटनेत माजी राज्यमंत्र्याच्या मुलानेच हे कृत्य केल्याचा आरोप आहे. कारागृहात बंद असलेल्या आरोपीने सांगितलेल्या ठिकाणी खोदकाम केल्यानंतर पोलिसांना मृतदेह सापडला. गुरुवारी दुपारी हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ निर्माण झाली.

Unnao
फतेहाबादमध्ये हॉटेलवर छापा; वेश्या व्यवसाय करणाऱ्या 5 जणांना अटक

उन्नावच्या दोस्तीनगर येथील दिव्यानंद आश्रमामागील सेप्टि टँकमध्ये ब्लँकेटमध्ये गुंडाळून तरुणीचा मृतदेह पुरण्यात आला होता. उन्नावमधील सपा सरकारमध्ये माजी राज्यमंत्री दिवंगत फतेह बहादूर सिंह यांचा मुलगा राजोल सिंहवर कांशीराम कॉलनीतील रिटा यांनी गंभीर आरोप केले होते. आपली मुलगी बेपत्ता असून, त्यामध्ये राजोल सिंहचा (Rajol Singh) हात असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

Unnao
श्रीनगर : सुफीवादातून कट्टरतावादाचा सामना; मौलवीचे शांततेसाठी प्रयत्न

या प्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवली होती, मात्र काहीच कारवाई झाली नाही. यावर रीटा यांनी २४ जानेवारीला लखनऊमध्ये अखिलेश यादव यांच्या ताफ्यासमोर उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यानंतर हे प्रकरण तापल्याने पोलिसांनी तडकाफडकी राजोलला अटक केली. 04 फेब्रुवारी रोजी, पोलिसांनी राजोलची आठ तास चौकशी केली. त्यानंतर मुबारकपूरच्या नवा गावात राहणारा त्याचा साथीदार सूरजची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी आरोपीच्या आश्रमाच्या मागे असलेल्या सेप्टिक टँकचा खड्डा खोदला. तेव्हा त्यातून मुलीचा मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com