उन्नावमध्ये दोन मुलींचा संशयित मृत्यू; शवविच्छेदन अहवाल आला समोर

टीम ई सकाळ
Friday, 19 February 2021

शेतात गेलेल्या तीन मुली बुधवारी (ता.18) सायंकाळी बेशुद्धावस्थेत आढळल्या होत्या. यातील 13 व 16 वर्षांच्या दोन मुलींचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.

उन्नाव - गुरांसाठी चारा आणण्यास बबुरहा (जि. उन्नाव) येथील त्यांच्या शेतात गेलेल्या तीन मुली बुधवारी (ता.18) सायंकाळी बेशुद्धावस्थेत आढळल्या होत्या. यातील 13 व 16 वर्षांच्या दोन मुलींचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू विषारी पदार्थामुळे झाल्याचा निष्कर्ष प्राथमिक शवविच्छेदन अहवालात नोंदविला आहे. विषारी पदार्थ कशा प्रकारचा आहे, हे समजू शकलेले नाही. हा प्रकार ‘ऑनर किलिंग’चा असावा असा संशय व्यक्त होत आहे. 

शवविच्छेदन अहवालानुसार मृत्यूच्या सहा तास आधी या मुलींनी विषारी पदार्थ खाल्ला होता. त्यांनी खाल्लेल्या अन्नात विषारी घटक असल्याचा शंका डॉक्टरांनी व्यक्त केली. दोघींच्या पोटात 80 ते 100 ग्रॅम अन्न आढळले. त्यांच्या शरीरातून मिळालेल्या विषारी पदार्थाची तपासणी करण्यासाठी त्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. पोलिसांनी न्याय वैद्यक प्रयोगशाळेच्या पथकाला पाचारण केले असून घटनास्थळाची पाहणी करून ते पुढील तपास सुरू करणार आहेत. या एकमेकींच्या चुलत बहीण आहेत.

हे वाचा - ‘तृणमूल’च्या गुंडांना तुरुंगांत डांबू : अमित शहा

‘‘जंगलात आढळलेल्या तिसऱ्या मुलीला (वय 17) कानपूर रुग्णालयात दाखल केले आहे. या पीडितेची स्थिती नाजूक आहे. तिला जीवरक्षक प्रणालीवर ठेवले असून डॉ. रश्‍मी कपूर यांच्यासह सहा डॉक्टरांचे पथक तिच्यावर उपचार करीत आहेत, ’’ रिजन्सी रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी परमजित अरोरा यांनी सांगितले. या मुलीच्या शरीरावर कोणत्याही जखमा आढळलेल्या नाहीत. हा प्रकार विषप्रयोगातून झाल्याचा संशय आहे, असेही ते म्हणाले.

दरम्‍यान, गुरे चारायला गेलेली बहीण परत आली नाही, म्हणून तिचा भाऊ काल सायंकाळी सातच्या सुमारास शेतात गेला असता ही घटना उघडकीस आली. ‘‘माझी 16 वर्षांची बहीण गुरांना चारा आणण्यासाठी दुपारी दोन वाजता शेतात गेली होती. ती तेथे गेलो असतो, माझी बहीण व अन्य दोन चुलत बहिणी बेशुद्धावस्थेत होत्या. त्यांचे हात-पाय बांधलेले होते,’’ असे त्याने जबाबात सांगितले.

Video: उशीरा GST भरणाऱ्यांना दिलासा; FM सीतारमण यांची पुण्यातील शिष्टमंडळाकडून भेट

मुलींच्या तोंडातून फेस
उन्नावचे पोलिस अधीक्षक आनंद कुलकर्णी म्हणाले की, बेशुद्धावस्थेत आढळलेल्या तिन्ही मुलींच्या तोंडातून पांढरा फेस येत होता. मात्र त्यांच्या कुटुंबीयांच्या दाव्यानुसार त्यांचे हात बांधलेले नव्हते आणि पायावर कोणत्याही जखमा नव्हत्या. या घटनेच्या तपासासाठी पोलिसांची सहा पथके तयार केली आहेत. 

भारत भारत भारत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: unnao minor girl death post mortem report