व्यवस्थेला आव्हान देणारी ‘उन्नाव की बेटी’

Unnao-Rape-Case
Unnao-Rape-Case

भुवनेश्‍वर - सध्या तणावपूर्ण शांततेत वावरणाऱ्या उन्नावमध्ये फक्त एकाच गोष्टीची चर्चा आहे अन्‌ ती म्हणजे त्या बलात्कारपीडितेच्या धैर्याची. घरातील लहानग्या मनोरुग्ण भावाची काळजी घेत तिनं प्रस्थापित सगळेच प्रवाह नाकारून एक वेगळं आयुष्य निवडलं होतं. स्वत:वर अत्याचार झाल्यानंतरदेखील तिनं रायबरेलीतील न्यायालयात जाऊन बाजू मांडली. घरातील सगळेच जण तिला विरोध करीत होते; पण ती डगमगली नाही. ‘जो डर गया, समझो मर गया’ हे व्यावहारिक सत्य तिनं पूर्णपणे अंगी बाणवलं होतं. म्हणूनच की काय, तिचं अस्तित्व त्या नराधमांच्या डोळ्यांमध्ये सलत होतं.

पाच बहिणींमध्ये ती तिसरी होती. घरची परिस्थिती तशी बेताचीच. समाजाच्या जातीय उतरंडीमध्ये त्यांचं कुटुंब हे अन्य मागासवर्गीयांचं. घराचे कर्तेधर्ते भाऊ आणि वडील, त्यांच्या कमाईवरच पीडितेचं कुटुंब गुजराण करीत होतं. तब्बल वर्षभरापूर्वी म्हणजे बारा डिसेंबर रोजी तिच्या गावात राहणाऱ्या तरुणांनी बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. यानंतर दुसऱ्याच दिवशी ती तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यामध्ये पोचली.

पण, तिथंही पोलिसांनी तिच्याकडे दुर्लक्षच केलं. त्यानंतरही तिनं याचा पाठपुरावा सुरूच ठेवल्यानंतर ४  मार्च रोजी याप्रकरणी शुभम आणि शिवम त्रिवेदी या दोन भावांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. हे सगळं शक्‍य झालं तिनं रायबरेली येथील न्यायालयात धाव घेतल्यानं. न्यायालयानंच आदेश दिले नसते, तर पोलिसांनी हे प्रकरण जागीच मिटवलं असतं, असं पीडितेचे निकटवर्तीय सांगतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com