2022 मधल्या कोरोना मृतांपैकी 92 टक्के मृत्यू लस न घेतलेल्यांचे: ICMR

covid vaccine
covid vaccinecovid vaccine

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचं संकट अजूनही कायम आहे. सध्या कोरोनाबाबतची परिस्थिती आटोक्यात असली आणि रुग्णसंख्या कमी असली तरीही चौथ्या लाटेची शक्यता आजही नाकारता येत नसल्याचं तज्ज्ञ सांगतात. सध्या या विषाणूविरोधात लढण्यासाठी कुणाकडेच 100 टक्के परिणामकारक असं औषध उपलब्ध नाहीये. मात्र, कोरोनापासून वाचण्यासाठी परिणामकारक ठरू शकतील, अशा लसी सध्या उपलब्ध झाल्या आहेत. कोरोना लसीसंदर्भातीलच एक महत्त्वाची बाब आता समोर आली आहे. भारतात 2022 मध्ये झालेल्या कोरोना मृतांपैकी तब्बल 92 टक्के लोक हे लसीकरण न झालेले होते. (Covid-19 across India in 2022)

covid vaccine
UP Election 2022 : युपी’त भाजप पराभवाच्या वाटेवर

केंद्र सरकारने गोळा केलेल्या आकडेवारीमधूनच ही बाब समोर आली आहे. भारतात 2022 मध्ये कोरोनामुळे जे मृत्युमुखी पडले आहेत, त्यांच्यापैकी जवळपास 92 टक्के रुग्ण हे लसीकरण न झालेले होते. या आकडेवारीमुळे पुन्हा एकदा लसीकरणाचं महत्त्व निर्विवादपणे अधोरेखित झाल्याचं दिसून येतंय. लसीकरणामुळे मृत्यूचा धोका नक्कीच कमी होतो, असाही निष्कर्ष या आकडेवारीमधून निघतो.

covid vaccine
Russia Ukraine War : तर चर्नोबिलपेक्षा मोठा विध्वंस; युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केलं सावध

यासोबतच आणखी एक चांगली बाब दिसून आली आहे. तिसऱ्या लाटेदरम्यान कोरोना लसीची परिणामकारकता ही अपेक्षित परिणामकारकतेहून अधिक होती. प्रयोगशाळेमध्ये करण्यात आलेल्या चाचण्यांमधून जे निष्कर्ष काढण्यात आले आणि परिणामकारकता जाहीर करण्यात आली त्याहून अधिक चांगली कामगिरी या लसींनी केली असल्याचं दिसून आल्याचं आयसीएमआरचे प्रमुख बलराम भार्गव यांनी सांगितलंय. लसीकरणाच्या गतीमुळे रुग्ण गंभीर होण्याचे तसेच रुग्णाचा मृत्यू होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या घटलं आहे. एप्रिल 2021 ते फेब्रुवारी 2022 द रम्यान मृत्यूदर अत्यंत कमी झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com