UP : भाजपच्या प्रचाराला कोरोनाचं ग्रहण! योगींना डबल चिंता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

UP
UP : भाजपच्या प्रचाराला कोरोनाचं ग्रहण! योगींना डबल चिंता

UP : भाजपच्या प्रचाराला कोरोनाचं ग्रहण! योगींना डबल चिंता

उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) राजधानी लखनऊमध्ये भाजप राज्य निवडणूक समितीची (BJP) बैठक काल पार पडली. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath), भाजप प्रदेश अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह, उत्तर प्रदेश भाजपचे निवडणूक प्रभारी राधामोहन सिंह (Radha Mohan Singh) यांच्यासह पक्षाचे अनेक बडे नेते उपस्थित होते. मात्र या बैठकीनंतरच राधामोहन सिंह यांचा कोरोना अहवाल सकारात्मक आला आहे.

हेही वाचा: Assembly Elections 2022 : कधी, कुठे, कशा होतील निवडणुका? वाचा सविस्तर

उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकांचं बिगूल वाजलं असून, सर्व पक्षांनी प्राचारासाठी कंबर कसली आहे. प्रचारासाठी भाजपनेही जोरदार तयारी सुरू केली असून, बैठकांवर बैठका सुरू आहेत. निवडणूक आयोगानं निवडणुकांच्या तारखा जाहीर करतानाच कोरोना संसर्गाचं आवाहन असल्यानं सर्व पक्षांना कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं होतं. त्यातच आता भाजपसारख्या मोठ्या पक्षाच्या प्रचाराच्या राज्यस्तरीय बैठकीतील नेता कोरोनाबाधित झाल्यानं चिंता वाढली आहे.

हेही वाचा: कर्ज न मिळाल्याने चक्क बँक पेटवली! कर्नाटकातील प्रकार

धक्कादाय म्हणजे या सभेत त्यांच्या शेजारी बसलेले स्वतंत्र देव सिंह यांनी बैठकीनंतर घरोघरी जाऊन प्रचार केला, जिथे त्यांनी अनेक ठिकाणी मास्क लावलेला नव्हता. एवढेच नाही तर स्वतंत्र देव सिंह प्रचारादरम्यान मास्कशिवाय मतदारांना भेटताना दिसले. ते घरोघरी पोस्टर चिकटवताना आणि त्यांना टिळक लावताना दिसले. काही व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये ते ज्यांना भेटत आहेत, त्या स्वतंत्र देव सिंह यांनीही मुखवटा घातलेला नसल्याचे दिसून येत आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BjpYogi Adityanath
loading image
go to top