esakal | वीज हवीय? शपथ घेऊन सांगा मलाच मत दिलंत; भाजप आमदाराचा VIDEO VIRAL
sakal

बोलून बातमी शोधा

वीज हवीय? शपथ घेऊन सांगा मलाच मत दिलंत; भाजप आमदाराचा VIDEO VIRAL

भाजप आमदार एका वृक्षारोपण कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. यावेळी भाषणात त्यांनी आपण केलेल्या विकासकामांचा पाढा वाचण्यास सुरुवात केली.

वीज हवीय? शपथ घेऊन सांगा मलाच मत दिलंत; भाजप आमदाराचा VIDEO VIRAL

sakal_logo
By
सूरज यादव

उत्तर प्रदेशातील एका भाजप आमदाराचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये एका नागरिकाकडून वीज मिळण्याची विनंती केल्यानंतर यावर आमदाराने तुम्ही मलाच मत दिलंत हे शपथ घेऊन सांगा असं उत्तर दिलं. वीज हवी का? तर मुलाची शपथ घेऊन सांगा तुम्ही मलाच मत दिलं होतं असं या आमदाराने म्हटलं आहे. शाहजहानपूरमधल्या मीरानपूर कटरा इथले भाजप आमदार वीर विक्रम सिंह यांचा हा व्हिडिओ चर्चेत आहे.

भाजप आमदार एका वृक्षारोपण कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. यावेळी भाषणात त्यांनी आपण केलेल्या विकासकामांचा पाढा वाचण्यास सुरुवात केली. तेव्हा एका नागरिकाने त्या भागात वीज कनेक्शन देण्याची विनंती केली. यावर आमदाराने म्हटलं की, तु गंगा नदीकडे हात करून किंवा मुलाची शपथ घेऊन सांग की मत मलाच दिलं आहेस. तर मी आजच तुझ्या घरी वीज कनेक्शन जोडून देतो. अपेक्षा त्यांच्याकडूनच केली जाते ज्यांना तुम्ही काहीतरी देता.

हेही वाचा: तिसरी लाट अटळ, निर्बंधातून सूट नको; IMA चा सरकारला सल्ला

आमदाराने असंही म्हटलं की, जर तुम्ही मत दिलं असतं तर तुम्ही मला जाब विचारू शकला असतात. आता मला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करू नका. माझे वडिल चार वेळा आमदार होते. मी आमदार झालो. कोणी असंच होत नाही. प्रत्येक बूथवर कोणी मत दिलं, हे आम्हाला माहिती नाही का? मत दिलं असंत आणि आम्ही लाइट दिली नसती तर तुम्ही आम्हाला सांगितलं असतं.

नागरिकाला शपथ घेण्यास सांगण्याबद्दल नंतर आमदार वीर विक्रम सिंह यांनी सारवासारव केली आहे. त्यांनी म्हटलं की, संबंधिताने त्याच्या घरी वीज कनेक्शनसाठी माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्याच्या घरी वीज कनेक्शनसाठी दहा लाख रुपयांचा खर्च आहे. सरकारच्या योजनेतून लाइट सार्वजनिक ठिकाणी लावली जाते असंही वीर विक्रम सिंह यांनी म्हटलं.

loading image