UP : २० लाख नोकऱ्या, महिलांसाठी ८ लाख पदे राखीव; काँग्रेसचा जाहीरनामा

Priyanka Gandhi
Priyanka Gandhi eSakal

दिल्ली - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी (UP Assembly Election 2022) काँग्रेसनं त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि उत्तर प्रदेश काँग्रेसच्या प्रभारी प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. दिल्लीतील मुख्यालयात हा कार्यक्रम पार पडला. काँग्रेसनं 20 लाख सरकारी नोकऱ्या यात शिक्षकांसाठीही नोकऱ्यांचं आश्वासन दिलं आहे.

जाहीरनामा प्रसिद्ध करताना प्रियांका गांधी यांनी म्हटलं की,'आमच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी जाऊन तरुणांशी चर्चा केली. त्यानंतर विश्लेषण केलं आणि 'भरती विधान' तयार केलं. जाहीरनाम्याला भरती विधान असं ना दिलं कारण यावेळी उत्तर प्रदेशातील तरुणांसमोर भरतीची मोठी समस्या आहे.' यासोबतच काँग्रेसनं असंही आश्वासन दिलं आहे की, उत्तर प्रदेशात सरकार आल्यास नोकरीसाठी अर्ज करताना त्याला शुल्क लागणार नाही.

'स्टार्टअपसाठी ५ हजार कोटी देऊ'

काँग्रेसनं त्यांच्या जाहीरनाम्यात २० लाख सरकारी नोकऱ्यांचं आश्वासन दिलं आहे. यामध्ये ८ लाख पदं महिलांसाठी असणार आहेत. तर प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांसाठी दीड लाख पदं भरण्यात येतील. याशिवाय स्टार्टअपसाठी ५ हजार कोटी रुपयांचां निधी दिला जाईल असंही म्हटलं आहे. यात ३० वर्षांपेक्षा कमी वयाच्या उद्योगपतींना प्राधान्य दिलं जाईल असंही काँग्रेसनं जाहीरनाम्यात म्हटलं आहे.

Priyanka Gandhi
Goa : शिवसेनेची पहिली यादी जाहीर; 10 ते 12 जागा लढणार

सात टप्प्यात मतदान

उत्तर प्रदेशात १० फेब्रुवारीपासून मतदानाला सुरुवात होणार आहे. सात टप्प्यात मतदान होईल. त्यानंतर निवडणुकीचा निकाल १० मार्चला लागणार आहे. उत्तर प्रदेशात गेल्या निवडणुकीत भाजपने ४०३ पैकी ३२५ जागा जिंकल्या होत्या. सपा आणि काँग्रेसने तेव्हा एकत्र निवडणूक लढली होती. समाजवादी पक्षाला ४७ तर काँग्रेसला फक्त ७ जागा मिळाल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com