'आधी मतदान, मग लग्न'; मंडपाऐवजी नवरदेव पोहोचला बूथवर; पाहा VIDEO

UP Election
UP Election
Summary

नवरदेवाने प्रतिक्रिया देताना म्हटलं की,'आधी मतदान नंतर लग्न, त्यानतंर सगळी कामं.'

लखनऊ - उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात मतदान सुरु आहे. सध्या मतदानाची प्रक्रिया सुरळीत सुरु असून सकाळी अकरा वाजेपर्यंत तब्बल २० टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. उत्तर प्रदेशात थंडीची लाट असूनही नागरिकांनी सकाळी ७ वाजल्यापासून मतदान केंद्रावर गर्दी केली होती. अत्यंत उत्साहाने मतदान सुरु आहे. मुझफ्फरनगरमधील (Muzaffarnagar) एक नवरदेव लग्नाच्या मंडपात जाण्याआधी थेट मतदानासाठी बूथवर पोहोचला.

मुझफ्फरनगरमधील अंकुर बालियान असं या वराचं नाव असून त्यानं लग्नसोहळ्याच्या आधी मदतानाचा हक्क बजावला. यावेळी नवरदेवाने प्रतिक्रिया देताना म्हटलं की,'आधी मतदान नंतर लग्न, त्यानतंर सगळी कामं.' मतदान करायला आलेल्या या नवरदेवाला प्रश्न विचारण्यात आला की, लग्न झाले की व्हायचे आहे. यावर अंकुर बालियान यांनी म्हटलं की,'लग्न व्हायचं आहे. मतदान केल्यानंतर आता वऱ्हाड घेऊन जाणार.'

UP Election
Up Election 2022:भाजपला कोण हरवणार;कंगनाचं ट्वीट चर्चेत

विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये मतदान होत आहे. यामध्ये ५८ विधासनभा मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत २० टक्क्यांपर्यंत मतदान झाले होते. निवडणूक आयोगाच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सकाळी सात वाजता सुरु झाली. हे मतदान संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com