Up Election 2022:भाजपला कोण हरवणार;कंगनाचं ट्वीट चर्चेत

भाजपच्या समर्थनार्थ अभिनेत्री सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही पोस्ट करत आली आहे.
Kangana Ranaut,Prime Minister Narendra modi,Yogi Adityanath
Kangana Ranaut,Prime Minister Narendra modi,Yogi Adityanathgoogle

उत्तरप्रदेशमधील विधानसभा (UP ELection 2022) निवडणुकांसाठी आज १० फेब्रुवारीला पश्चिम युपी मध्ये ५८ जागांसाठी मतदान पार पडणार आहे. पंतप्रधान मोदी(Narendra Modi) आणि राहुल गांधी पासून अनेक मोठ्या नेतेमंडळींनी या निवडणुकांसाठी जोरदार प्रचार केलेला आपण साऱ्यांनीच पाहिला असेल. यामध्येच आता अभिनेत्री कंगना रणौतने(Kangana Ranaut) भाजपच्या विजयाला घेऊन मोठं वक्तव्य केलं आहे. कंगनाने पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो पोस्ट करीत लिहिलंय-''अंतिम विजय आमचाच होणार आहे. ज्यांच्या पाठी भगवान राम आहेत त्यांना कोणी हरवू शकत नाही''. असा एकंदरीत तिच्या पोस्टचा अर्थ आहे.

Kangana Ranaut,Prime Minister Narendra modi,Yogi Adityanath
लग्नाच्या पहिल्या रात्रीवरुन कपिलनं छेडलं बिपाशाला;पहा काय म्हणाला

आणखी एक पोस्ट कंगनानं केली आहे,जिच्यात काव्यात्मक रचनेची झलक पहायला मिळते आहे. तिने त्या पोस्टमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या कामाचं कौतूक करताना म्हटलं आहे,''महिलांना सुरक्षित वातावरण मिळालं,मुलींना शिकण्याचं,पुढे जाण्याचं,आत्मनिर्भर होण्याचं स्वातंत्र्य मिळालं. लोकांना सम्मान मिळाला,योगी सरकारनं युपीचं नाव मोठं केलं. महिला-मुलींना सुरक्षित वातावरण देतानाच युपीचा विकास करीत,तिथल्या गुंडा-गर्दीवर नियंत्रण मिळवत,गुन्हेगारांवर वचक बसवला या अशा योगी सरकारच्या कामाचा आपण सम्मान करायला हवा''.

Kangana Ranaut,Prime Minister Narendra modi,Yogi Adityanath
'गहराइयां सिनेमा तुम्हाला पाहता येणार नाही जर...' सविस्तर वाचा

या आजच्या मतदान दिवसाच्या काही तास आधीच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचा एक फोटो ट्वीट करत म्हटलं आहे,''या निवडणुकीत भाजपाचा विजय निश्चित आहे''. याच पोस्टला कंगनानं शेअर केलं आहे. तिच्या या पोस्टवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पहायला मिळत आहेत. बॉलीवूडपासून राजकारणापर्यंत सगळ्याच मुद्द्यांवर कंगना नेहमीच रोखठोक मत मांडताना दिसते. पण अनेकदा यामुळे ती वादातच पडते. पण अनेकदा पाहिलं गेलंय की कंगना भाजपाच्या समर्थनार्थच नेहमीच बोलत आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com