UP : 'गुड न्यूज'साठी 15 दिवसांची रजा हवीय...' पोलिस कॉन्स्टेबलच्या अनोख्या अर्जाची चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

up news of police constable

... त्यामुळे हा अर्ज सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

'गुड न्यूज'साठी 15 दिवसांची रजा हवीय...' पोलिस कॉन्स्टेबलच्या अनोख्या अर्जाची चर्चा

उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात तैनात असलेल्या एका पोलिस कॉन्स्टेबलने रजेसाठी वरिष्ठांना एक अनोखा अर्ज दिला आहे. यामध्ये कॉन्स्टेबलने लिहलंय की, माझ्या लग्नाला सात महिने झाले आहेत, मात्र अजूनही कोणतीही 'गुड न्यूज' मिळालेली नाही. त्यामुळे कृपया मला 15 दिवसांची सुट्टी द्यावी, असा अर्ज केला आहे. त्यामुळे हा अर्ज सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

जिल्ह्यातील तैनात असलेल्या गोरखपूर येथील एका शिपायाने हा अर्ज दिला आहे. या अर्जात पोलिसाने लिहलंय की, माझ्या लग्नाला सात महिने झाले आहेत. अजूनही गोड बातमी मिळालेली नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध घेतले असून त्यासाठी एकत्र राहावे लागते. पुढील काही दिवस घरीच राहणार असून मला सुट्टी मिळावी अशी विनंती केली आहे. अशा आशयाचे पत्र त्यांनी दिलं आहे.

हेही वाचा: गृहिणींसाठी गुड न्युज; महागाईपासून सामान्यांना दिलासा, खाद्यतेलाच्या दरात मोठी घसरण

दरम्यान, हे पत्र व्हायरल झाल्यानंतर यूपीच्या पोलिस विभागात चर्चेत आले आहे. एकीकडे पोलिस खात्यातील लोक या गोष्टीची खिल्ली उडवत असताना दुसरीकडे सुट्टीच्या कारणावरुनही जोरदार चर्चा सुरु आहे. चोवीस तासांची ड्युटी आणि कामाच्या ताणामुळे पोलिस कर्मचारी बऱ्याच वेळा कुटुंबीयांना वेळ देऊ शकत नाहीत, सुट्टीही मिळत नाही. अशा परिस्थितीत विशेषत: महिला पोलिसही प्रचंड अस्वस्थ दिसत आहेत. पोलिस खात्यात रजा मिळत नसल्यामुळे अनेकवेळा लोक नोकरीला राम राम ठोकतात किंवा आत्महत्येसारखे भयंकर पाऊल उचलल्याचीही माहिती समोर येते.

राज्यात काही सण किंवा संवेदनशील परिस्थिती असल्यास पोलिस खात्यातील सर्व सुट्ट्या रद्द केल्या जातात. अनेकवेळा देशाच्या हितासाठी पोलिस कर्मचारी त्यांची जबाबदारी पार पाडत आहेत. पोलिसांच्या जबाबदाऱ्या अपूर्ण राहतात. यूपी पोलिस विभागात महिलांसाठी प्रसूती रजा आणि पुरुषांसाठी पितृत्व रजेची तरतूद आहे. ही रजा महिलांसाठी 180 दिवस आणि पुरुषांसाठी 15 दिवस आहे. ही रजा संपूर्ण नोकरीदरम्यान दोनदाच घेता येते.

हेही वाचा: MH Politics : राऊतांनंतर आता पुढचा नंबर उद्धव ठाकरेंचा, निलेश राणेंचं सूचक वक्तव्य

Web Title: Up Police Constable Leave Application To Officer 15 Days Good News After Marriage

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..