योगी सरकारचा मोठा निर्णय; पोलीस महासंचालकांना पदावरून हटवले

योगी सरकारचा मोठा निर्णय; पोलीस महासंचालकांना पदावरून हटवले

लखनऊ : उत्तर प्रदेश सरकारने पोलीस महासंचालक मुकुल गोयल (Mukul Goel) यांना पदावरून हटवले आहे. आदेशाचे पालन न केल्याने आणि कामकाजात रुजी न घेतल्याने गोयल यांना हटवण्यात आले आहे, असे सरकारकडून सांगण्यात येत आहे. (UP DGP Mukul Goel Removed From Post )

योगी सरकारचा मोठा निर्णय; पोलीस महासंचालकांना पदावरून हटवले
खासदार संभाजीराजे प्रकरण : सकल मराठातर्फे उद्या तुळजापूर बंदची हाक

मुकुल गोयल यांनी जुलै 2021 मध्ये राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला होता. पदभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर लक्ष केंद्रित केले जाईल असे विधान केले होते. तसेच पोलीस कर्मचारी संवेदनशील आहेत आणि राज्यातील लोकांशी जोडलेले असल्याचे सांगितले होते. गोयल यांनी यापूर्वी अल्मोडा, जालौन, मैनपुरी, हाथरस, आझमगड, गोरखपूर, वाराणसी, सहारनपूर आणि मेरठ जिल्ह्यात एसपी/एसएसपी म्हणून काम केले आहे. तसेच त्यांची इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस आणि नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्समध्येही नियुक्ती करण्यात आली होती.

योगी सरकारचा मोठा निर्णय; पोलीस महासंचालकांना पदावरून हटवले
भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकाऱ्यानं Video शेअर करताच लोक भडकले

कोण आहेत मुकुल गोयल

मुकुल गोयल हे पश्चिम उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील रहिवासी असून, ते 1987 बॅचचे IPS अधिकारी आहेत. यूपीचे पोलीस महासंचालक होण्यापूर्वी ते सीमा सुरक्षा दलात एडीजी म्हणून कार्यरत होते. गोयल यांचा जन्म 22 फेब्रुवारी 1964 रोजी शामलीमध्ये झाला. त्यानंतर त्यांचे सुरुवातीचे शिक्षण शामलीमध्येच झाले. गोयल यांनी इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये बी. टेकचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्याशिवाय त्यांनी व्यवस्थापन क्षेत्रात एमबीएचे शिक्षणही पूर्ण केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com