UPI MDR Charges : २ हजारांवरील UPI व्यवहारांवर ०.४% शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम लागू

UPI MDR Charges to Apply From October 15 : व्यापाऱ्यांसोबतच्या २ हजार रुपयांवरील यूपीआय व्यवहारांवर १५ ऑक्टोबरपासून ०.४ टक्के एमडीआर शुल्क लागू होणार आहे.
UPI MDR Charges

UPI MDR Charges

esakal

Updated on

नवी दिल्ली : व्यावसायिकांबरोबर केलेल्या दोन हजार रुपयांवरील ‘यूपीआय’ व्यवहारांवर ०.४ टक्के मर्चंट डिस्काउंट रेट (एमडीआर) शुल्क लागणार असून, या निर्णयाची १५ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी होईल, असे ‘नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ने (एनपीसीआय) जाहीर केले आहे. तसेच, ७५ हजार रुपयांवरील प्रत्येक व्यवहारासाठी ३०० रुपयांची शुल्कमर्यादा निश्चित केली आहे. तसेच, दोन व्यक्तींमधील व्यवहारांवर कोणतेही शुल्क लागणार नाही, असे वित्त मंत्रालयाने स्पष्ट केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com