
London PhD and UPSC Cleared Professor Cheats Pune University
Esakal
पुण्यातील एका खासगी विद्यापीठाला आयआयटी मुंबईतील प्राध्यापकाचं नाव वापरून एका उच्चशिक्षित आणि प्राध्यापक म्हणून काम केलेल्या तरुणाने २.४६ कोटींना गंडा घातल्याची घटना समो रआलीय. या प्रकरणी आरोपीला हैदराबादमधून अटक केली आहे. आऱोपीने खासगी विद्यापीठाला एआय आणि ड्रोन प्रकल्प मिळवून देऊ असं आश्वासन दिलं. यासाठी मुंबईतील एका प्राध्यापकाचा फोन नंबर दिला गेला. फंडिग प्रकल्पासाठी २ टक्के रक्कम भरावी लागेल असं म्हणत विद्यापीठाकडूनच कोट्यवधी रुपये उकळले आणि फरार झाला होता. पण पोलिसांनी त्याला हैदराबादमधून अटक केली असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.