UPSC पूर्व परिक्षेचा निकाल जाहीर

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 24 October 2020

यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२० व भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा २०२० चा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

नवी दिल्ली- यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२० व भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा २०२० चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने(यूपीएससी) आपल्या अधिकृत वेबसाइटवर याची माहिती दिली आहे. 

यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२० ही ४ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना पूर्व परिक्षेचा निकाल upsc.gov.in या वेबसाईटवर पाहता येणार आहे. पण, काही तांत्रिक कारणास्तव यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट काम करत नसल्याची माहिती  पीटीआय वृत्तसंस्थेने दिली आहे. upsc.gov.in या वेबसाईटवर निकाल पाहता येत नसल्यास विद्यार्थ्यांनी upsconline.nic.in या वेबसाईटला भेट द्यावी. याठिकाणी पीडीएफ डॉक्युमेंट डाऊनलोड करुन यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा आणि भारतीय वन सेवा(Indian Forest Services) पूर्व परीक्षेचा निकाल पाहता येणार आहे. 

हा तर 'हाऊडी मोदी'चा परिणाम; ट्रम्प यांच्या वक्तव्यावरुन सिब्बल यांचा...

यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा आणि भारतीय वन सेवा(Indian Forest Services) पूर्व परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांना आता मुख्य परिक्षा देता येणार आहे. यासंबंधी माहिती मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना upsc.gov.in  यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: UPSC prilim exam result out

Tags
टॉपिकस
Topic Tags: