

Oil Route Politics: US Attention on Kharg Island, Hormuz Access in Focus
sakal
वॉशिंग्टन: इराणसाठी तेलाचे मुख्य टर्मिनल असलेल्या खार्ग बेटाचा ताबा घेण्याची कल्पना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडली आहे. पर्शियन आखातातील खार्ग बेटावर अमेरिकेचा डोळा आहे. ‘‘कदाचित आपण खार्ग बेट घेऊ, कदाचित नाही. आमच्याकडे अनेक पर्याय आहेत,’’ असे ट्रम्प यांनी सोमवारी ‘फायनान्शियल टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.