भारतात टिकटॉक पुन्हा सुरु होणार? हालचाली सुरु

US investors reportedly keen to buy Chinese-owned app to avert Trump ban
US investors reportedly keen to buy Chinese-owned app to avert Trump ban

नवी दिल्ली : भारत चीन-संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतात टिकटॉकसह ५९ चायनीज अॅपवर बंदी घालण्यात आल्यानंतर टिकटॉकचे धाबे दणाणले आहेत. अशातच, भारतापाठोपाठ आता अमेरिकेतदेखील टिकटॉकवर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, टिकटॉकचे भारत आणि अमेरिकेत सगळ्यात जास्त वापरकर्ते असल्याने टिकटॉकची मालक कंपनी बाइटडान्स हे अॅप दुसऱ्या एखाद्या कंपनीला विकण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टिकटॉक हे अॅप अमेरीकेतील एखादी गुंतवणुकदार कंपनी विकत घेण्याची शक्यता आहे. बाईटडान्सच्या सीइओने काही दिवसांपुर्वी टिकटॉक अॅपच्या भविष्यासाठी आम्ही त्याची विक्री करण्यासाठी तयार आहोत असे जाहीर केलं होतं. त्यानंतर अमेरिकेतील बरेच गुंतवणुकदार टिकटॉक विकत घेण्याच्या प्रयत्नात आहेत, जनरल अटलांटीक आणि सिक्योईया कॅपिटल या कंपन्या अमेरिकेच्या सरकारसोबत टिकटॉक खरेदी करण्याबद्दल बोलणी करत आहेत, असे वृत्त द गार्डियनने दिलं आहे. असं झालं तर भारतातील टिकटॉकच्या वापरकर्त्यांसाठी ही अनंदाची बातमी ठरु शकते आणि भारतात टिकटॉक पुन्हा चालू होण्याचा मार्ग सुकर होऊ शकतो.

अमेरिकेत टिकटॉकच्या डेटा पॉलिसीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे, टिकटॉक हे अॅप राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका असल्याचे सांगण्यात येत आहे, अमेरिकेत टिकटॉकवर बंदी घालण्यात यावी का याच्या निर्णयासाठी मतदान घेण्यात आलं होतं. ज्यामध्ये नॅशनल डिफेंन्स ऑथराईजेशन अॅक्टनुसार या अॅपवर बंदी घालण्याच्या बाजूने जास्त संख्येने मत पडली आहेत. मात्र, अमेरीकेने अजून टिकटॉकवर बंदी घातलेली नाही. आता जर अमेरिकेतील गुंतवणुकदार टिकटॉक मध्ये जास्त भागीदारी विकत घेतीली तेव्हाच ते अमेरिकेत टिकू शकेल.

भारत आणि अमेरिका या देशांचे चीनसोबत संबंध मागच्या काही दिवसात जास्तच बिघडले आहेत, त्यामुळे बाइटडान्स जर अॅप पुर्णपणे अमेरिकेतील गुंतवणुकदारांना विकले तर अमेरिकी आणि भारत या दोन्ही देशात टिकटॉक परत येऊ शकते. अमेरिकी कंपनीने टिकटॉक विकत घेतले, तर भारतातदेखील टिकटॉक पुन्हा सुरु होण्याची जास्त शक्यता आहे. अमेरिकेतील गुंतवणुकदारांनी कंपनीत जास्त शेअर खरेदी केले तर अमेरिकेत देखील अॅप बॅन होण्यापासून वाचेल आणि पुन्हा सगळीकडे चालू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com