

Israel reaction to US Iran ceasefire deal
esakal
United States Iran tensions : अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धविराम चर्चेत पाकिस्तानच्या भूमिकेबाबत इस्रायलने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. या वादामुळे दोन्ही देशांतील अनेक वर्षांपासूनचा अविश्वास पुन्हा एकदा उघड झाला. इस्रायलच्या मते, ज्यांच्या नेतृत्वाकडून वारंवार इस्रायलविरोधी वक्तव्ये केली जातात, असा देश निष्पक्ष मध्यस्थ कसा ठरू शकतो?
वादाची सुरुवात पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी सोशल मीडियावर इस्रायलविरोधात केलेल्या कठोर वक्तव्यांपासून झाली. या वक्तव्यांना इस्रायलने भडकाऊ आणि अस्वीकार्य ठरवले आहे.