

Tensions Rise Over Strait of Hormuz; US and Iran Exchange Major Attacks
sakal
दुबई: होर्मुझ सामुद्रधुनीवरील नियंत्रणाच्या मुद्द्यावरून अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला असून, शनिवारी दोन्ही देशांनी एकमेकांच्या लष्करी व पायाभूत सुविधांवर हल्ले केले. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही बाजूंनी सातत्याने हल्ले सुरू आहेत. संघर्षाचा केंद्रबिंदू आता होर्मुझ सामुद्रधुनी बनला असून, अमेरिका-इराण संघर्ष दिवसेंदिवस चिघळत चालला आहे.