

अमेरिकेकडून इंडो पॅसिफिक कमांडचं नाव बदलण्यात आलं आहे. आता या नावातून इंडो शब्द हटवला असून त्याचं मूळ नाव युएस पॅसिफिक कमांड असं करण्यात आलंय. अमेरिकेच्या युद्ध विभागाने या बदलाची घोषणा केलीय. या निर्णयामुळे अमेरिकेच्या लष्करी कमांडला पुन्हा त्यांचं ऐतिहासिक नाव मिळालं आहे. या नावावर त्यांनी ७ दशकांपेक्षा जास्त काळ काम केलं होतं. अमेरिकेच्या युद्ध विभागाने भारताचा उल्लेख करत म्हटलं की, या कमांडची हद्द भारताच्या पश्चिम सीमेपर्यंतच असेल. Why the US Removed ‘Indo’ From Its Military Command