Video: ताज महाल पाहून ट्रम्प भारावले; व्हिजिटर्स बुकमध्ये काय म्हणाले पाहा!

टीम ई-सकाळ
Monday, 24 February 2020

ताजमहाल एक प्रेरणा आहे, असा अभिप्राय अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी ताज महाल भेटीनंतर दिलाय. 

नवी दिल्ली : तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी आज, सायंकाळी आग्रा येथे ताज महालला (Taj Mahal) भेट दिली. यावेळी त्यांच्या पत्नी, मेलानिया, (Melania Trump) कन्या इवांका, (Ivanka Trump) जावई जेरेड कुशनेर  उपस्थित होते. आग्रा विमानतळावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे स्वागत केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारत दौऱ्यावर आलेल्या ट्रम्प यांनी पहिल्यांदा अहमदाबादला भेट दिली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्वागत केले. विमानतळावरून त्यांनी महात्मा गांधी यांच्या साबरमती आश्रमाला भेट दिली. तेथे डोनाल्ड ट्रम्प आणि पत्नी मेलानिया यांनी तेथे चरख्यावर सूतही विणले. जवळपास 22 किलोमीटरचा रोड शो त्यांनी केला. त्यानंतर जगातील सर्वांत मोठ्या मोटेरा क्रिकेट स्टेडियममध्ये नमस्ते ट्रम्प Namaste Trump कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात ट्रम्प यांनी भारतीय संस्कृतीचं कौतुक केलं. तसेच त्यांनी भारत अमेरिका संबंध भविष्यात आणखी दृढ होतील, याची ग्वाही दिली. 

आणखी वाचा - ट्रम्प म्हणतात, दहा वर्षांत भारतातील गरिबी हटणार

आणखी वाचा - ट्रम्प दाम्पत्यानं साबरमती आश्रमता विणलं सूत 

ट्रम्प म्हणतात वाह् ताज
नमस्ते ट्रम्प कार्यक्रमानंतर ट्रम्प यांचे एअरफोर्स विमान, आग्रा येथे रवाना झाले. आग्रा येथे त्यांनी ताजमहालला सपत्निक भेट दिली. ताजमहालला भेट दिल्यानंतर ट्रम्प भाराऊन गेले होते. त्यांनी ताजमहालच्या व्हिजिटर्स बुकमध्ये आपला अभिप्राय लिहिला आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, 'ताजमहाल एक प्रेरणा आहे. हा भारताच्या विभिन्न आणि संपन्न संस्कृतीचा एक वारसा आहे. धन्यवाद भारत'.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: us president donald trump visits taj mahal says thanks to India