असा झाला ओवैसींच्या गाडीवर गोळीबार; चित्तथरारक व्हिडीओ आला समोर

असा झाला ओवैसींच्या गाडीवर गोळीबार; चित्तथरारक व्हिडीओ आला समोर

गाझियाबाद : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीनचे (एआयएमआयएम) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याची घटना गुरुवारी घडली. हापूर जिल्ह्यातून दिल्लीला परतत असताना ही घटना घडली. दरम्यान, या प्रकरणात वापरलेली शस्त्र सापडली असून एका आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

असा झाला ओवैसींच्या गाडीवर गोळीबार; चित्तथरारक व्हिडीओ आला समोर
UP Election : असदुद्दीन ओवैसींच्या कारवर गोळीबार; थोडक्यात बचावले!

हापूर-गाझियाबाद भागातील राष्ट्रीय महामार्गावर २४ वरील छिजारसी टोल प्लाझाजवळ ओवेसी यांची गाडी आली असताना सायंकाळी सहा वाजता गोळीबाराची घटना घडली. ‘‘माझ्या गाडीवर चार गोळ्या झाडल्या गेल्या. गोळीबार करणारे तीन-चार जण होते, शस्त्रे टाकून ते सर्वजण पळून गेले. माझी गाडी पंक्चर झाली. तेव्हा दुसऱ्या गाडीतून मी पुढे रवाना झालो,’’ असे ट्विट ओवेसी यांनी घटनेनंतर केले.

“निवडणूक आयोगाने या प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी करावी. यात कुणाचा हात होता, याचा तपास करावा. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मोदी सरकारनेही याची चौकशी करावी,” अशी मागणी ओवेसी यांनी केली आहे.

असा झाला ओवैसींच्या गाडीवर गोळीबार; चित्तथरारक व्हिडीओ आला समोर
सीरियात ISIS च्या म्होरक्याचा खात्मा; अमेरिकेचा दावा

या संदर्भात बोलताना मेरठचे पोलिस महानिरीक्षक आयजी प्रवीणकुमार त्रिपाठी म्हणाले, `` पिलखुवा प्लाझा येथे गोळीबार झाल्याचे बोलले जात आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून माहिती घेत आहोत. या मार्गावरून ओवेसींचा ताफा जात होता. काही लोकांत वाद झाला होता, एवढीच माहिती मिळाली आहे. या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही. परंतु, गोळीबार झाला नसल्याचे टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.``

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com