श्रीरामाचा जयघोष न करणाऱ्यांच्या DNAवर शंका - योगी आदित्यनाथ

Yogi-Adityanath
Yogi-Adityanath

नवी दिल्ली- जय श्री राम (jay shree ram) न बोलणाऱ्या व्यक्तीच्या डीएनएबद्दल शंका वाटते, असं वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Uttar pradesh cm yogi aadityanath) यांनी केले आहे. योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी गोरखपुरमधील एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी 'लाईव्ह हिंदूस्तान'चे एडिटर इन चीफ शशी शेखर यांना मुलाखत दिली. यावेळी जय श्री रामसंबंधी त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी बोलताना ते म्हणाले की जय श्री राम म्हणण्यात कोणाला अडचण असेल असं मला वाटत नाही. (National latest marathi news)

उत्तर प्रदेशच नाही भारतातील कोण्या व्यक्तीला जय श्री राम म्हणण्यात काही अडचण असेल असं मला वाटत नाही. राम आपले पूर्वज आहेत. आपल्याला यावर गर्व असायला हवा. ज्या लोकांना असं वाटत नाही त्यांच्या डीएनएबाबत माझ्या मनात शंका आहे, असं योगी आदित्यनाथ म्हणाले. काही लोकांना राज्यात भीती वाटत आहे. त्यांना जय श्री राम म्हणण्यास बळजबरी करण्यात येत असल्याचं त्यांना मुलाखतीत विचारण्यात आले होते.

Yogi-Adityanath
काँग्रेस नेत्याच्या मुलाचे ISIS कनेक्शन? NIA चा छापा

योगी आदित्यनाथ म्हणाले की, गेल्या दोन वर्षांच्या काळात मला अनेक धर्माच्या लोकांना मिळण्याचा योग आला. वेगवेगळ्या वेळी लोकांनी मला बोलावलं. मी त्यांचं बोलणं काळजीपूर्वक ऐकतो. चांगलं बोलतात ते. आज उत्तर प्रदेशचा प्रत्येक व्यक्ती मान्य करेल की दंगे होत नाहीयेत. दंगे झाले तर हिंदू मरेल मग मुसलमान सुरक्षित राहील का. एक गट मरेल तर दुसऱ्यालाही त्याची झळ बसेल. एक गट सुरक्षित असेल तर दुसरा गट देखील सुरक्षित राहील.

Yogi-Adityanath
राज्यसभेत तृणमुलचे सहा खासदार दिवसभरासाठी निलंबित

उत्तर प्रदेशातील असा कोणताही नागरिक नाही ज्याला जय श्री राम म्हणण्यास संकोच वाटतो, असं योगी म्हणाले. यावर शशी शेखर म्हणाले की, तुम्ही सर्व नागरिकांना जय श्री राम म्हणण्यास सांगत आहात? यावर योगी म्हणाले की, 'राम आपले पूर्वज आहेत. मी हे म्हणत नाहीये, जगातील सर्वात मोठी मुस्लीम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशिया आपले पूर्वज रामाला मानतो. इंडोनेशियात मुस्लिम देखील रामलीला करतात. आपण कोणत्या युगात जगत आहोत. राम आपले पूर्वज असल्याचा आपल्याला अभिमान असायला हवा. आपल्याला गर्व वाटायला हवे. इंडोनेशियाला यावर गौरव वाटत असेल तर आपल्याला का वाटू शकत नाही. रामाशी आपला संबंध असल्याचा आपलाल्या अभिमान असायला हवा. जर काहींना असे वाटत नसेल तर मला त्यांच्या डीएनएवर शंका येते.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com