poison
ESakal
देश
Crime: ८ वर्षांपासून प्रेम, पण लग्नाआधी प्रियकराची भलतीच मागणी, प्रेयसीला मोठा धक्का बसला अन् पोरीनं नको तो निर्णय घेतला
Uttar Pradesh Crime News: बरेलीमध्ये हुंड्यामध्ये पैसे आणि गाडी देण्यास नकार दिल्याने प्रियकराने प्रेयसीसोबत लग्न मोडले. यानंतर तरुणीने धक्कादायक पाऊल उचलले आहे.
उत्तर प्रदेशातील बरेली येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. हुंड्याच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे पुरूषाने महिलेशी लग्न करण्यास नकार दिल्याने आठ वर्षांच्या प्रेमप्रकरणाचा दुःखद अंत झाला. मनाने दुःखी झालेल्या महिलेने तिच्या प्रियकराच्या घरी जाऊन विष प्राशन केले. कुटुंब आणि शेजाऱ्यांनी तिला ताबडतोब जिल्हा रुग्णालयात नेले, जिथे तिची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.

