Husband Shaves Wife HeadESakal
देश
Crime: मध्यरात्री वाद झाला; पतीचा पारा चढला, रागाच्या भरात पत्नीला टक्कल करून बदला घेतला, नेमकं प्रकरण काय?
Husband Shaves Wife Head: उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यात एका पतीने भांडणानंतर पत्नीचे मुंडण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पत्नीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका पतीने भांडणानंतर आपल्या पत्नीचे मुंडण केले. पीडित पत्नीने सांगितले की, प्रथम त्याने तिला मारहाण केली. शिवीगाळ केली आणि नंतर तिचे मुंडण केले. या घटनेने खळबळ उडाली आहे.

