

Gorakhpur woman deadbody found
ESakal
उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक हत्येची घटना घडली आहे. पीपीगंजमधील नाल्यावरील पुलाखाली झुडपात एका नग्न महिलेचा मृतदेह आढळला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी सकाळी काही रहिवासी नेहमीप्रमाणे फिरायला गेले होते. झुडपात मृतदेह पाहून ते घाबरले. पीपीगंज पोलीस ठाण्याला तात्काळ कळवण्यात आले.