

Ghazipur Student Beating
ESakal
उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथील एका शाळेतील शिक्षकाने सातवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला बेदम मारहाण केली. ती विद्यार्थिनी शाळेच्या आवारात तिच्या मैत्रिणीशी बोलत असताना शिक्षकाने तिला पाहिले आणि तिच्यावर हल्ला केला. त्याने तिला भिंतीवर ढकलले आणि लाथा आणि ठोसे मारले. शिक्षकाने तिला इतके मारहाण केली की, ती शाळेतच बेशुद्ध पडली. त्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी दिली.