Kasganj DJ Argument Incident
ESakal
देश
Crime: लग्नात वराच्या दाजीचा पारा चढला; रागातून अनेकांना कारखाली चिरडलं, तिघांचा मृत्यू, धक्कादायक कारण समोर
Uttar Pradesh Crime News: डीजेने संगीत बंद केले. ज्यामुळे वराच्या दाजीला राग आला. यानंतर रागातून त्याने धक्कादायक कृत्य केले आहे. यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यात एका लग्न समारंभात डीजे सिस्टीमवरून वाद झाला. या वादानंतर संतप्त आणि मद्यधुंद अवस्थेत एका तरुणाने लोकांवर आपली कार चालवली. ज्यामुळे तीन जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. आरोपी कौशल यादव घटनास्थळावरून पळून गेला. यामुळे खळबळ उडाली आहे.

