Shocking News: एका रसगुल्ल्यासाठी झाली मारामारी; एकाचा मृत्यू अन् १२ हून अधिक जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shocking News

Shocking News: एका रसगुल्ल्यासाठी झाली मारामारी; एकाचा मृत्यू अन् १२ हून अधिक जखमी

Agra: युपीच्या आग्रामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. लग्नसमांरभात जेवणाच्या ठिकाणी रसगुल्ला न मिळाल्याने चक्क चाकूने वार केल्याची घटना घडली आहे. लग्नसोहळ्यात रसगुल्ल्यावरून वर आणि वधू पक्षातील काही लोकांमध्ये वाद झाला आणि या वादातून एकाचा खून झाला. तर १२ हून अधिक जण जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर वधूला न घेताच वऱ्हाडी घरी परतले.

खंडौलीतील व्यापारी वकार यांची मुले जावेद आणि रशीद यांचे बुधवारी रात्री आग्रा येथील एतमादपूर शहरातील विनायक भवन येथे लग्न होते. लग्नाआधी असलेल्या डिनरदम्यान रसगुल्ल्यावरून पाहुण्यामध्ये वाद झाला. मुलाच्या लग्नाची मिरवणूक आत पोहोचल्यानंतर पाहुण्यांसाठी रसगुल्ले ठेवण्यात आले होते. एकाने एकापेक्षा जास्त रसगुल्ले (Food) मागितले असता काउंटरवरील तरूणाने नकार दिला म्हणून वाद सुरू झाला.

हेही वाचा: Shocking: महिलेने घरात पाळलेत चक्क एक लाख झुरळ, घराची भयानक अवस्था बघून अधिकारीही अवाक

या वादानंतर दोन्ही पक्षांत जोरदार भांडण पेटले. अखेर चाकू निघालेत. चाकूने जोरदार हाणामारी आणि खुर्चीफेकही झाली. या हाणामारीतच एकाचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा: Shocking News: द्यायचा होता बकऱ्याचा बळी पण गमवावा लागला चिमुकल्याला जीव...

या गोंधळानंतर वधूच्या घरी पसरली शोककळा

या गोंधळानंतर काही वेळातच लग्नाचं आनंददायी वातावरण दु:खात विलीन झालं. या घटनेने मिरवणुकीतील २० वर्षीय सनी मुलगा खलील याचा मृत्यू झाला तर शाहरूख जखमी झाला. या गोंधळानंतर वरपक्षाने चिडत लग्नास नकार दिला. वरपक्षाची समजूत काढल्यानंतरही वधूला न घेताच ते घरी परतले. या संपूर्ण प्रकरणानंतर वधूपक्षाच्या घरी शोककळा पसरली आहे.