उत्तर प्रदेशात मायावतींना मोठा धक्का; 75 टक्के आमदारांची पक्षाला 'सोडचिठ्ठी', BSP कडे उरले चारच आमदार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mayawati

मायावती युपीच्या सत्तेत चार वेळा विराजमान झाल्या आणि राष्ट्रीय पक्ष होण्याचा मानही त्यांनी पटकावला; पण..

मायावतींना मोठा धक्का; 75 टक्के आमदारांची पक्षाला 'सोडचिठ्ठी'

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

उत्तर प्रदेशात निवडणुकीच्या (Uttar Pradesh Election) पार्श्वभूमीवर वातावरण चांगलंच तापलं असून आता अनेक आमदार पक्षांतर करताना दिसत आहेत. बसपा विधीमंडळ पक्षाचे नेते शाह आलम उर्फ ​​गुड्डू जमाली (Guddu Jamali) यांनी गुरुवारी मायावतींना पत्र लिहून पक्षाचा निरोप घेतला. हा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. बसप सोडलेले गुड्डू जमाली हे पहिले आमदार नसून 75 टक्के आमदारांनी मायावतींची (Mayawati) साथ सोडलीय. 2017 मध्ये बसपाचे 19 आमदार निवडून आले आणि आता पक्षात फक्त चारच उरले आहेत. यूपीमध्ये अपना दल आणि काँग्रेसपेक्षा बसपचे (BSP) कमी आमदार उरले आहेत.

मायावतींचा राजकीय आलेख घसरला

मायावती या युपीच्या सत्तेत चार वेळा विराजमान झाल्या आणि राष्ट्रीय पक्ष (BSP National Party) होण्याचा मानही त्यांनी पटकावला; पण 2012 पासून पक्षाचा आलेख खाली घसरायला लागलाय, तो अजूनही थांबलेला नाही. अशा स्थितीत मायावतींनी 2017 पासून आतापर्यंत चार प्रदेशाध्यक्ष बदलून त्यांचा घसरलेला राजकीय पाया थांबवला, पण ना आमदारांची पक्ष सोडण्याची प्रक्रिया थांबली, ना 2022 च्या निवडणुकीत पक्ष आघाडीवर राहिला.

हेही वाचा: 'उदयनराजेंना 'बिनविरोध' करता अन् माझा पराभव, मी दुधखुळा नाही'

आमदारांची 'बसपा'ला सोडचिठ्ठी

बसपा विधीमंडळ पक्षाचे नेते शाह आलम उर्फ ​​गुड्डू जमाली यांनी मायावतींना मोठा झटका देत आझमगडच्या सगडी येथून बसपा आमदार वंदना सिंह यांनी पक्ष सोडल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी त्यांनी पक्ष सोडला. लालजी वर्मा यांनी पक्ष सोडल्यानंतर बसपा प्रमुख मायावती (BSP Chief Mayawati) यांनी आझमगडच्या मुबारकपूर मतदारसंघाचे आमदार शाह आलम उर्फ ​​गुड्डू जमाली यांना विधिमंडळ पक्षाचे नेते बनवले. जमाली सपामध्ये जाऊ शकतात, असं मानलं जात आहे. या संदर्भात जमाली यांनी सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याशी चर्चा केली असून ते लवकरच सपाचे सदस्यत्व स्वीकारणार असल्याचं कळतंय.

हेही वाचा: 'शिवेंद्रराजेंसह राष्ट्रवादीचे नेतेही माझ्या पराभवाला जबाबदार'

यूपी विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागल्याने मायावतींचे सरदार पक्ष सोडून इतर पक्षांमध्ये जात आहेत. त्यामुळं निवडणुकीपूर्वीच पक्षात पेच निर्माण झाला आहे. सहा महिन्यांत लालजी वर्मा आणि गुड्डू जमाली यांच्यासह बसप विधीमंडळ पक्षाचे दोन नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिलीय. आता जमालीऐवजी मायावतींनी उमाशंकर सिंह यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केलीय.

हेही वाचा: 'मोदींच्या दाढीत घरंच घरं'; एकदा दाढी झाडली की, 50 लाख घरं बाहेर पडतात'

बसपात फक्त चारच आमदार शिल्लक

2017 च्या विधानसभेत बसपाने केवळ 19 जागांवर विजय मिळवला. परंतु, लोकसभेनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत एक जागा गमावल्याने पक्षाच्या 18 जागा झाल्या आहेत. यानंतर एकामागून एक आमदाराचा बसपामध्ये भ्रमनिरास होऊ लागला, त्यानंतर 2022 च्या निवडणुकीपर्यंत मायावतींनी 19 पैकी 15 आमदार गमावले. मायावतींनी पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या 9 आमदारांना वेगवेगळ्या वेळी निलंबित केलं. त्यानंतर लालजी वर्मा आणि राम अचल राजभर यांची हकालपट्टी करून दोघांनी सपामध्ये प्रवेश केलाय. पक्षात आता श्याम सुंदर शर्मा, उमाशंकर सिंह, विनय शंकर तिवारी, आझाद अरिमर्दन हे आमदार राहिले आहेत.

हेही वाचा: NCP उमेदवाराच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारुन उपाध्यक्षांचा राजीनामा

loading image
go to top