वर्दीत असलेल्या पत्नीला भर रस्त्यावर बेदम मारहाण

वृत्तसंस्था
Friday, 16 October 2020

उत्तर प्रदेशात महिलांवर होणाऱया अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. एका घटनेच वर्दीत असलेल्या पत्नीला तिच्या नवऱयाने भर रस्त्यात बेदम मारहाण केल्याची घटना घडली असून, संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

लखनौ: उत्तर प्रदेशात महिलांवर होणाऱया अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. एका घटनेच वर्दीत असलेल्या पत्नीला तिच्या नवऱयाने भर रस्त्यात बेदम मारहाण केल्याची घटना घडली असून, संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Video : ...म्हणून गावकऱ्यांनी फेकल्या आमदारावर चपला

बदायू येथे महिला पोलिसाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. कोरोना रुग्णालयातून आपली ड्युटी संपवून जात असताना वर्दीतल्या महिलेला तिच्या पतीने रस्त्यातच गाठून मारहाण करण्यास सुरवात केली. रस्त्यावरून जाणारे अनेकजण हे दृश्य पाहात होते. पण, त्याला रोखण्यासाठी पुढे कोणी येत नव्हते. अखेर नागरिकांची गर्दी झाल्यानंतर नवरा बाजूला झाला. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यानंतर महिलेच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Video: काकांनी जेसीबीने घेतली खाजवून पाठ...

दरम्यान, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी प्रतिक्रियांच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत. वर्दीतल्या महिलेला अशापद्धतीनं मारणे कितपत योग्य आहे? वर्दीचा आणि महिलेचा हा अपमान किती अमानुषपणाचा कळस, नागरिकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली का? अशा प्रतिक्रिया नेटिझन्स नोंदवत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: uttar pradesh police women constable beaten up on street video viral