Akhilesh Yadav: आमदारांच्या धक्क्यांमध्ये अखिलेश यादवांनाही खुश होण्याची संधी, NDA आमदाराचे सपाला मतदान, नेमकं काय घडलं?

Akhilesh Yadav: उत्तर प्रदेशात राज्यसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीच्या आमदारांनी मोठ्या संख्येने क्रॉस व्होट करत भाजप उमेदवाराला मतदान केले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात होता.
Akhilesh Yadav
Akhilesh Yadavesakal

Akhilesh Yadav: उत्तर प्रदेशात राज्यसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीच्या आमदारांनी मोठ्या संख्येने क्रॉस व्होट करत भाजप उमेदवाराला मतदान केले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात होता.  सपाच्या किमान पाच आमदारांनी भाजपला मतदान केल्याचा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवला जात आहे.

दरम्यान अखिलेश यादव यांनाही खुश होण्याची संधी मिळाली आहे. एनडीएचा भाग असलेल्या ओपी राजभर यांच्या पक्षाचे सुभासपाचे आमदारने समाजवादी पार्टीला मतदान केले आहे. राजभर यांच्या पक्षाचे आमदार जगदीश नारायण राय यांचे मत सपा उमेदवाराला गेले आहे.

जगदीश नारायण राय यांनी निवडणुकीपूर्वी ओ.पी.राजभर यांच्यासह कोणालाही याची कल्पना येऊ दिली नाही. आमदारांची एकजूट दाखवण्यासाठी ओपी राजभर यांनी सर्व आमदारांसह एक दिवस आधी मुख्यमंत्री योगी यांची भेट घेतली होती. तेव्हाही जगदीश नारायण उपस्थित होते. एवढेच नाही तर जगदीश नारायण यांनी योगींच्या डिनरलाही हजेरी लावली होती.

जगदीश नारायण राय हे जौनपूरच्या जाफ्राबाद विधानसभेचे आमदार आहेत. मात्र, आमदारांनी क्रॉस व्होटिंगचे वृत्त फेटाळून लावले आहे. ते म्हणाले क्रॉस व्होटिंगच्या बातम्या पूर्णपणे अफवा आहेत. मतदान करत असताना सुभाषच्या पोलिंग एजंटने मतदानाचा पेपर हिसकावण्याचा प्रयत्न केला.

Akhilesh Yadav
Manoj Jarange Patil: आमच्या मंडपाला, व्यासपीठाला हात लावला तर गृहमंत्र्याला...; मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा

उत्तर प्रदेशमध्ये 10 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 11 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपने आठ तर सपाने तीन उमेदवार उभे केले. मतांच्या गणितानुसार सपाला तिसरा आमदार विजयी करण्यासाठी तीन मतांची गरज आहे. भाजपला आठव्या उमेदवारासाठी नऊ मतांची कमतरता आहे. (Latest Marathi News)

सपाच्या क्रॉस व्होटिंगमुळे भाजपचा आठवा उमेदवार पहिल्या पसंतीतच विजयी होईल, असे मानले जात आहे. तसे न झाल्यास दुसऱ्या पसंतीच्या भाजप उमेदवाराचा विजय निश्चित आहे. पहिल्या पसंतीची मते जमवता आली नाहीत तर दुसऱ्या पसंतीचे सर्व उमेदवार विजयी होतील, असे भाजपने आधीच गृहीत धरले आहे.

Akhilesh Yadav
Maharashtra Budget 2024: ग्रामसडक योजना ते सागरी बंदर; पायाभूत सुविधांसाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com