उत्तर प्रदेश 'अनलॉक'; रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर योगींचा निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yogi government

कोरोना विषाणूच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत असल्याने उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने रविवारपासून लॉकडाउन पूर्णपणे हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

उत्तर प्रदेश 'अनलॉक'; रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर योगींचा निर्णय

लखनऊ (उत्तर प्रदेश) : कोरोना विषाणूच्या (Coronavirus) संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत असल्याने उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) योगी सरकारने (Yogi government) रविवारपासून (22 ऑगस्ट) लॉकडाउन (Lockdown) पूर्णपणे हटवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे रविवारपासून यूपीत कोणतेही निर्बंध राहणार नसल्याचेही सरकारने स्पष्ट केलेय. त्यातच रविवारी हिंदूंचा मुख्य सण रक्षाबंधन (Rakshabandhan) देखील आहे.

यूपीत लसीकरण मोहीम जोरात

उत्तर प्रदेश सरकारने म्हटले आहे, की कोविडवर नियंत्रण ठेवण्यासाठी आक्रमक ट्रेसिंग, चाचणी आणि उपचारांसह यूपीने जलद लसीकरण अधिक चांगले दर्शविले आहे. आत्तापर्यंत राज्यात 7 कोटी 1 लाख 69 हजारांहून अधिक कोविड नमुन्यांची चाचणी घेण्यात आलीय. याशिवाय 6 कोटी 24 लाखांहून अधिक लोकांना लस दिली गेली आहे. ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांची संख्या लवकरच एक कोटी पार करेल. आत्तापर्यंत देशभरात कोरोना लसीचे 57 कोटी 22 लाख 81 हजार 488 डोस देण्यात आले आहेत, त्यापैकी 12 कोटी 77 लाख 95 हजार 457 लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत.

हेही वाचा: तालिबानच्या उदयावर पंतप्रधान मोदींचं अत्यंत सूचक विधान

सद्यस्थितीत यूपीत कोरोनाचे 407 रुग्ण

उत्तर प्रदेश आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गुरुवारी राज्यात 25 लोकांना कोरोनाची लागण (Coronavirus in Uttar Pradesh) झाल्याचे आढळून आले. या दरम्यान, 35 लोक बरे झाले, तर 2 रुग्णांना आपला जीव गमवावा लागलाय. उत्तर प्रदेशात आत्तापर्यंत 17.09 लाखांहून अधिक लोकांना कोविड-19 ची लागण झालीय. त्यापैकी 16.85 लाख लोक बरे झालेत, तर 22,789 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या उत्तर प्रदेशात कोविडचे 407 रुग्ण सक्रिय आहेत. उत्तर प्रदेशातील कोविडची बिघडलेली परिस्थिती पाहता, रविवारी साप्ताहिक बंद रद्द करण्यात आलाय. त्यामुळे आत्तापासूनच सर्व शहरे आणि त्यांच्या बाजारपेठांमध्ये केवळ पूर्व-निर्धारित साप्ताहिक बंद दिवसांवर सुट्टी असेल. यासंदर्भात आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी करण्यात आली आहेत.

हेही वाचा: पंजाबमध्ये काँग्रेसला मिळणार 'बळ'

यूपीत 15 जिल्हे कोरोनामुक्त

कोरोना काळात सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे यूपीतील जनजीवन पुन्हा पूर्वपदावर येत आहे. आज राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. यामध्ये अलिगढ, अमेठी, बदाऊं, बस्ती, देवरिया, फर्रुखाबाद, हमीरपूर, हरदोई, हातरस, कासगंज, महोबा, मिर्झापूर, संत कबीरनगर, श्रावस्ती आणि शामली या जिल्ह्यांचा समावेश आहे. हे जिल्हे सध्या कोरोनामुक्त आहेत.

Web Title: Uttar Pradesh Unlock From Sunday Cm Yogi Adityanath Orders New Corona Guidelines

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Yogi government