

उत्तर प्रदेशात एका महिलेनं पाच वेळा नसबंदी केली तरी अडीच वर्षात २५ वेळा आई झाली. इतकंच नाही तर महिलेला ४५ हजार रुपयेसुद्धा मिळाले. हे सगळं कागदावर रंगवण्यात आलंय. यातून जननी सुरक्षा योजना आणि महिला नसबंदी प्रोत्साहन योजनेचे पैसे घेतले गेले. हा प्रकार समोर आल्यानंतर आता खळबळ उडाली आहे.