उत्तराखंडमध्ये भाजप भाकरी फिरवणार? 

BJP
BJP

नवी दिल्ली - उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांच्या कामाच्या शैलीबाबत सत्तारूढ भाजप आमदारांमध्ये असलेल्या तीव्र नाराजीला तोंड फुटल्यावर त्यांना बदलण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. उद्या डेहराडून येथे भाजप आमदारांची बैठक आहे व तीत नव्या नावाबाबतची घोषणा करण्यात येईल असे समजते.  

मुख्यमंत्री रावत यांनी आज अचानक दिल्लीचा दौरा करून भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा व संघटनमंत्री बी. एल. संतोष यांच्याशी चर्चा केली. मात्र, गृहमंत्री अमित शहा यांची भेट त्यांना मिळाली नाही. त्यानंतर शहा यांनी उत्तराखंडबाबत नड्डा व संतोष यांच्याबरोबर दीर्घ चर्चा केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रावत यांना पक्षाच्या सर्वेसर्वा नेतृत्वाकडून राजीनामा देण्याचा स्पष्ट आदेश दिला गेल्याचे समजते. दोन दिवसांपूर्वी पक्षनेतृत्वाने रमणसिंह व दुष्यंत गौतम यांना उत्तराखंडला पाठविले होते. त्यांनी भाजपच्या ४५ आमदारांशी चर्चा करून आपला अहवाल दिला. त्यानंतर रावत यांना बदलण्याच्या हालचालींना वेग आला. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपला पुढील वर्षीची विधानसभा निवडणूक जिंकणे केवळ अशक्‍य असल्याचे म्हणणे आमदारांनी पक्षनेतृत्वाला या वेळी सांगितले. मुख्यमंत्र्यांना मध्येच बदलायचे नाही, हे सूत्र मोदी-शहा यांनी पाळले आहे. मात्र उत्तराखंडमध्ये रावत यांच्या निष्क्रियतेविरूद्ध भाजपमध्येच उद्रेक होण्याची चिन्हे दिसल्यावर त्यांना बदलणे अपरिहार्य ठरल्याचे दिसते.

इच्छुकांमध्ये कोशियारीही?
उत्तराखंडच्या स्थापनेनंतर गेल्या दोन दशकांत नारायणदत्त तिवारी वगळले तर एकाही मुख्यमंत्र्यांना मुदत पूर्ण करता आलेला नाही. यात राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांचाही समावेश आहे. त्यामुळेच तेही यावेळेस उत्सुक आहेत. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या इतर नावांत अजय भट्ट, सतपाल महाराज, धनसिंह रावत, अनिल बलुनी यांच्या नावांची चर्चा आहे. यातील रावत, भट्ट यांची नावे विशेष आघाडीवर आहेत.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com