Uttarakhand Foundation Day: उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी केल्या महत्वाच्या घोषणा

Uttarakhand Foundation Day : मातृशक्तीचा सर्वांगीण विकास आणि सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने आम्ही "महिला धोरण" तयार केले आहे
Uttarakhand Foundation Day
Uttarakhand Foundation Day sakal

National News : उत्तराखंड स्थापना दिनानिमित्त मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी राज्याच्या मातृशक्तीचा सर्वांगीण विकास आणि सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने आम्ही "महिला धोरण" तयार केले आहे अशी घोषणा केली.

हे धोरण लवकरच लागू केले जाईल असे त्यांनी सांगितले. याच बरोबर देवभूमी असलेल्या उत्तराखंडचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि "बालमजुरी निर्मूलनासाठी" सर्व विभागांच्या समन्वयाने एक विशिष्ट कृती आराखडा तयार केला जाईल जाईल असेही मुख्यमंत्री पुष्कर सिंह म्हणाले.

Uttarakhand Foundation Day
Uttarakhand: उत्तराखंड मधील उद्योजकांचे सहभागीदार उत्तराखंड राज्य असेल मुख्यमंत्र्यांचा रोड शो मध्ये विश्वास

यावेळी ते असेही म्हणाले कि, अमली पदार्थमुक्त उत्तराखंडचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही “ड्रग फ्री व्हिलेज” आणि “ड्रग फ्री सिटी” योजना आणल्या आहेत, अशा भागांना विशेष प्रोत्साहन दिले जाईल.

मातृशक्तीने राज्य उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावली असून महिला हा आपल्या राज्याचा कणा आहे. गरजू कुटुंबांना आवश्यक ती मदत देण्यासाठी ‘मुख्यमंत्री कन्या सामूहिक विवाह’ योजना सुरू करण्यात येणार आहे. असे कार्यक्रम जिल्हास्तरावर आयोजित केले जातील आणि त्यासाठी राज्य सरकार व्यवस्था करेल.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राज्यातील चार व्यक्तिमत्त्वांना उत्तराखंड गौरव सन्मानाने सन्मानित करण्यात आले. माधुरी बर्थवाल, बसंती बिश्त, सच्चिदानंद भारतीय आणि राजेंद्र सिंह बिश्त यांना विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट सेवेबद्दल उत्तराखंड गौरव सन्मानाने सन्मानित करण्यात आले.

Uttarakhand Foundation Day
PM Modi in Uttarakhand: मोदी बनले आदि कैलासाचे दर्शन घेणारे पहिले प्रधानमंत्री, पार्वतीकुंडात केली ध्यानधारणा

उत्तराखंड राज्य स्थापना दिनानिमित्त, पोलीस लाइन्स, डेहराडून येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उत्तराखंडच्या सर्व जनतेचे अभिनंदन व शुभेच्छा दिल्या. आपल्या अभिभाषणात राष्ट्रपती म्हणाले की, राज्याच्या निर्मितीनंतर नव्या ओळखीसह उत्तराखंडच्या कष्टकरी जनतेने राज्याच्या विकासाच्या आणि प्रगतीच्या नव्या उंचीवर आपले पाय रोवले आहेत.

राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा आणि अभिनंदन करताना, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी उत्तराखंड राज्याच्या उभारणीत योगदान दिलेल्या सर्व अमर हुतात्म्यांना आणि राज्य आंदोलकांना आदरपूर्वक श्रद्धांजली वाहिली. यासोबतच मुख्यमंत्र्यांनी भारत मातेच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या उत्तराखंडच्या शूर सैनिकांना संपूर्ण उत्तराखंडच्या जनतेच्या वतीने श्रद्धांजली वाहिली.

Uttarakhand Foundation Day
Uttrakhand Election: सहा महिन्यांत ५५० पेक्षा जास्त निर्णय घेऊन कार्यवाही केली-धामी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com