
गेल्या आठवड्यात चमोली जिल्ह्यातील तपोवन भागात ग्लेशिअर तुटल्यानं ऋषिगंगा आणि धौलीगंगा नद्यांना अचानक पूर आला होता. यामुळे इथं तयार केलेला एनटीपीसी हायड्रो पॉवर प्लांटही वाहून गेला.
नवी दिल्ली - उत्तराखंड सरकार चमोलीमध्ये ग्लेशियर तुटल्याच्या घटनेचा तपास करत आहे. यासाठी एक विभाग निर्माण करण्याची तयारी सुरु आहे. दरम्यान, केंद्र सरकारकडे अशीही मागणी केली जात आहे की, त्या रडार सिस्टीमचा शोध घ्यावा जी अमेरिकेनं 56 वर्षांपूर्वी हिमालयाच्या पर्वतरांगेत पाठवली होती. यामध्ये प्लुटोनियमने चालणारे कॅप्सूल होते. या रडारच्या सहाय्याने चीनवर नजर ठेवण्यात येणार होती. याबाबतची माहिती जलसिंचन मंत्री सतपाल महाराज यांनी सोमवारी दिली होती.
सतपाल महाराज यांनी सांगितलं की, त्यांच्या मंत्रालयाअंतर्गत एक विभाग तयार करण्यात येईल जो ग्लेशिअर्सची सॅटेलाइटमधून पाहणी करून अभ्यास करेल. जर ग्लेशिअर प्लुटोनिअममध्ये झालेल्या स्फोटामुळे तुटले असेल तर उत्तराखंड आणि गंगा नदीमध्ये धोकादायक रेडिएशन पसरू शकतात.
हे वाचा - किरण बेदी यांना पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल पदावरून हटवलं
1964 मध्ये चीनने अण्वस्त्र चाचणी केली होती. त्यानंतर 1965 मध्ये अमेरिकेनं भारतासोबत मिळून चीनवर नजर ठेवण्यासाठी एक करा केला होता. या अंतर्गत हिमालयात नंदा देवी पर्वतावर एक रडार लावण्यात येणार होतं. यामध्ये अण्वस्त्र उर्जेवर चालणारे जनरेटर लावले होते. या जनरेटरमध्ये प्लुटोनिअमचे कॅप्सूल होते. मात्र जेव्हा ही मशिन्स पर्वतावर आणण्यात येत होती तेव्हा वातावरण खराब झालं आणि पथकाला मागे परतावं लागलं होतं.
मशिन्स मात्र तिथेच राहील आणि नंतर ग्लेशिअरमध्ये हरवली होती. मशिन्स हरवल्यानंतर अमेरिकेनं त्याठिकाणी दुसऱी सिस्टिम लावली होती. आता शंका व्यक्त केली जात आहे की, चमोलीमध्ये ग्लेशिअर या प्लुटोनिअममुळे तर तुटले नाही ना. प्लुटोनिअम पॅक साधारणत: 100 वर्षापर्यंत प्रभावी असतं असं मानलं जातं.
हे वाचा - पेट्रोल दरवाढीतून धडा घ्या; केंद्रीय मंत्री गडकरींनी दिला सल्ला
गेल्या आठवड्यात चमोली जिल्ह्यातील तपोवन भागात ग्लेशिअर तुटल्यानं ऋषिगंगा आणि धौलीगंगा नद्यांना अचानक पूर आला होता. यामुळे इथं तयार केलेला एनटीपीसी हायड्रो पॉवर प्लांटही वाहून गेला. एका बोगद्यात चिखल साचला असून अद्याप बचावकार्य सुरु आहे. आतापर्यंत जवळपास 60 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. याशिवाय छिन्नविछिन्न झालेले अवयवही सापडले असून त्यांची ओळख डीएनएवरून पटवली जाईल.