
उत्तराखंडमध्ये गेल्या काही आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी, ढगफुटी यामुळे भूस्खलन होऊन दुर्घटनाही घडल्या आहेत. अनेक रस्ते बंद झाल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. वीजपुरवठा खंडित झाला असून पाणी पुरवठाही काही भागात बंद आहे. पर्वतीय भागात सातत्यानं भूस्खलनाच्या घटना समोर येत आहेत. आता अल्मोडा इथं दरड कोसळल्याची घटना घडलीय. पर्वतावरून खाली कोसळणारे दगड धडकून एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.