उत्तराखंडमध्ये पावसाचा हाहाकार; 47 जणांचा मृत्यू

उत्तराखंडमध्ये पावसाचा हाहाकार; 47 जणांचा मृत्यू
Summary

अतिवृष्टी आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत ४७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

डेहराडून - उत्तराखंडमध्ये दोन दिवसांपासून पावसाना हाहाकार माजवला आहे. अतिवृष्टी आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत ४७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे कुमाउं भागात मोठा फटका बसला आहे. उत्तराखंडमधील नैनिताल, हल्दानी, उधम सिंह नगर आणि चंपावत जिल्यात मुसळधार पाऊस झाला. यामुळे भूस्खलनाच्या दुर्घटना घडल्या आहेत. नैनितालमधील २८ जणांचा तर अल्मोडा आणि चंपावत जिल्ह्यात मिळून १२ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय इतर ठिकाणी दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला.

राज्यात ओढावलेल्या या आपत्तीत मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली आहे. बचावकार्यासाठी हवाई दलाची मदत घेतली जात आहे. मुसळधार पावसाने नैनितालचा संपर्क तुटला होता. मात्र अखेर परिस्थिती पुर्ववत करण्यामध्ये यश आलं आहे.

खराब हवामान आणि पावसाची रिपरिप सुरु असतानाही रस्ते सुरु करण्यात आले आहेत. दरड कोसळलेल्या ठिकाणी मातीचा ढिग काढण्यात आला आहे. पर्यटन स्थळांकडे जाणारी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. तसंच अडकलेले पर्यटक कालाधुंगी आणि हलद्वानीच्या रस्त्याने परत येत आहेत.

उत्तराखंडमध्ये पावसाचा हाहाकार; 47 जणांचा मृत्यू
सामाजिक सुरक्षेची हमी देणाऱ्या मोदी सरकारच्या ५ योजना; असा घ्या लाभ

उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील पावसाच्या स्थितीची हवाई पाहणी केली आहे. तसंच पावसामुळे फटका बसलेल्या भागाचा आणि नुकसानीचा आढावा त्यांनी घेतला. या आपत्तीत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रुपये देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तसंच ज्यांचे घर यामुळे कोसळले त्यांना १.१० लाख रुपये देण्यात येणार असल्याचं राज्य सरकारने म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com