Uttarakhand : ४३९ रस्त्यांसाठी २५९ कोटींचा निधी मंजूर; मुख्यमंत्री धामी यांनी मानले नितिन गडकरी यांचे आभार

या कामांमुळे येणाऱ्या पर्यकटांची होणारी गैरसोय थांबेल
Uttarakhand
Uttarakhand esakal

Uttarakhand :

लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने केंद्रीय रस्ते पायाभूत सुविधा निधी अंतर्गत उत्तराखंड राज्यातील ४३९ रस्त्यांसाठी २५९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या रकमेतून प्रस्तावित रस्त्यांचे नूतनीकरण आणि संरक्षक कामे केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिली. या कामांमुळे येणाऱ्या पर्यकटांची होणारी गैरसोय थांबेल,असेही ते म्हणाले.   

Uttarakhand
Uttarakhand Tunnel: 41 कामगारांना बाहेर काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे 'हिरो'; रेस्क्यू टीमबद्दल जाणून घ्या

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत. CRIF अंतर्गत मंजूर झालेल्या रस्त्यांपैकी पौरी लोकसभा मतदारसंघातील १६४ किमीपैकी सात, अल्मोडामधील १८० किमीपैकी चार आणि टेहरी येथील ६५ किमीचा एक आणि नैनितालच्या ३० किमी रस्त्याचा समावेश आहे.  

Uttarakhand
Uttarakhand high court: 'गर्भवती महिलांना सरकारी नोकरीपासून वंचित ठेवता येणार नाही', उत्तराखंड उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सीएम धामी यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे या रस्त्यांच्या आवश्यक दुरुस्तीची मागणी केली आहे. राज्याचे सार्वजनिक महत्त्व.त्यासाठी CRIF अंतर्गत निधी मंजूर करण्याची विनंती करण्यात आली. (Uttarakhand)

विविध लोकसभा मतदारसंघांतर्गत एकूण ४३९ किमी रस्त्यांची सुधारणा आणि सुरक्षेशी संबंधित कामांमुळे या भागातील जनतेला तसेच राज्यात येणाऱ्या पर्यटकांच्या वाहतुकीत सुसूत्रता येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com