Uttarkashi Tunnel Rescue: मोहीम फत्ते! सिल्क्यारा बोगद्यात अडकलेले सर्व 41 कामगार सुखरुप बाहेर

उत्तराखंड येथील सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू होते.
Uttarkashi Tunnel Rescue: मोहीम फत्ते! सिल्क्यारा बोगद्यात अडकलेले सर्व 41 कामगार सुखरुप बाहेर

उत्तराखंड येथील सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या सर्वच्या सर्व 41 मजुरांच्या सुटकेची मोहीम अखेर फत्ते झाली आहे. मोठ्या प्रयत्नानंतर त्यांना तब्बल १७ दिवसांनंतर बाहेर काढण्यात यश आलं आहे. १२ नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या दिवशी ही घटना घडली होती. तेव्हापासून त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) जवानांनी बोगद्यात जाऊन मजुरांच्या सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. त्यांच्या अथक प्रयत्नांना अखेर यश आले. (Latest Marathi News)

दिवाळीच्या दिवशीच अडकले

बोगद्याचे काम सुरू असताना त्याचा काही भाग कोसळल्यामुळे १२ नोव्हेंबर रोजी ऐन दिवाळीमध्ये 41 मजूर बोगद्यात अडकले होते. त्या दिवसापासून सुरू झालेलं बचावकार्य आज पूर्ण झालं. या बचावकार्यात अनेक अडथळे येत होते. मात्र, हवाईदल, ओएनजीसी, डीआरडीओसह अन्य सरकारी यंत्रणांनी योग्य समन्वय ठेवून बचाव कार्य अचुकपणे राबवले. या बचावकार्यासाठी आंतरराष्ट्रीय बोगदा तज्ज्ञांची मदतही घेण्यात आली. अत्याधुनिक ड्रिलिंग मशिन्सद्वारे खोदकाम करण्यात आले. (Marathi Tajya Batmya)

Uttarkashi Tunnel Rescue: मोहीम फत्ते! सिल्क्यारा बोगद्यात अडकलेले सर्व 41 कामगार सुखरुप बाहेर
Uttarkashi Tunnel Rescue: बोगद्यातील मजूर आज बाहेर येणार? अवघे काही मीटर राहिलं अंतर; कुटुंबीयांना बॅगा भरुन ठेवण्याचे निर्देश

रॅट मायनर्सनं केलं मोठं काम

मजुरांना बोगद्याच्या बाहेर काढण्यासाठी बोगद्याच्या सर्व बाजूंनी खोदकाम करण्यात येत होते, यामध्ये महत्त्वाचे काम केले ते म्हणजे रॅट मायनर्सनं. ऑगर मशिनमध्ये बिघाड झाल्यानंतर उर्वरित काम पूर्ण करण्याची जबाबदारी रॅट मायनर्सने घेतली. 17 दिवसांपासून बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यात देश-विदेशातील मोठमोठी मशीन्स अपयशी ठरत असताना, रॅट मायनर्सने शर्थीचे प्रयत्न करत त्यांना बाहेर काढण्यात यश मिळवले आहे.(Latest Marathi News)

Uttarkashi Tunnel Rescue: मोहीम फत्ते! सिल्क्यारा बोगद्यात अडकलेले सर्व 41 कामगार सुखरुप बाहेर
Uttarkashi Tunnel Rescue: मशीनपेक्षा वेगाने होतंय हाताने खोदकाम; बोगद्यातील मॅन्युअल ड्रिलिंगचा व्हिडिओ आला समोर

सुरुवातीला 48 मीटर खोदल्यानंतर बोगद्यात ऑगर मशीन अडकले. यानंतर ते कापून बाहेर काढण्यात आलं. यानंतर रैट माइनर्संना पाचारण करण्यात आलं. हे तज्ज्ञ हातानं खोदण्याचं काम करतात. दरम्यान, या बचावकार्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे लक्ष ठेवून होते. त्यामुळे शासकीय यंत्रणा आणि बचावकार्याला वेग आला.

दुसरीकडं, मजुरांचे कुटुंबीय त्यांची आतुरतेने प्रतीक्षा करत होते. दरम्यान, बोगद्यात अडकलेल्या 41 मजूरांना पाईपद्वारे अन्नपाण्याचा पुरवठा केला जात होता. ते सर्व मजूर आता सुखरूप बाहेर आले आहेत.

Uttarkashi Tunnel Rescue: मोहीम फत्ते! सिल्क्यारा बोगद्यात अडकलेले सर्व 41 कामगार सुखरुप बाहेर
Uttarkashi Tunnel Rescue : बोगद्यात अडकलेल्या मजूरांचं मानसिक आरोग्य तपासणार स्वदेशी 'रोबो', मिलिंद राज यांची माहिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com