कोरोनाला प्रतिबंध करणारी लस येत्या काही आठवड्यांत उपलब्ध - नरेंद्र मोदी

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 5 December 2020

कोरोनाला प्रतिबंध करणारी लस येत्या काही आठवड्यांत उपलब्ध होईल, अशी दिलासादायक घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. या लशीचा दर सर्वसामान्यांना परवडणारा असावा, यासाठी राज्यांशी चर्चा सुरू असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. तसेच, ज्येष्ठ नागरिक, कोरोना योद्ध्यांना पहिल्या टप्प्यात लस दिली जाऊ शकते, असे सूतोवाचही त्यांनी केले.

नवी दिल्ली - कोरोनाला प्रतिबंध करणारी लस येत्या काही आठवड्यांत उपलब्ध होईल, अशी दिलासादायक घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. या लशीचा दर सर्वसामान्यांना परवडणारा असावा, यासाठी राज्यांशी चर्चा सुरू असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. तसेच, ज्येष्ठ नागरिक, कोरोना योद्ध्यांना पहिल्या टप्प्यात लस दिली जाऊ शकते, असे सूतोवाचही त्यांनी केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना संकटावर चर्चा करण्यासाठी आज बोलाविण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींनी कोरोनावरील लस लवकरच उपलब्ध होणार असल्याचे जाहीर केले. या बैठकीत राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, तृणमूलचे सुदीप बंदोपाध्याय यांच्यासह अन्य विरोधी पक्षांचे प्रमुख नेते, लोकसभा आणि राज्यसभेचे खासदारही उपस्थित होते. या बैठकीपूर्वी काँग्रेसचे  नेते राहुल गांधींनी ट्विटद्ववारे पंतप्रधानांना सर्व भारतीयांना मोफत कोरोना लस कधीपर्यंत मिळेल, असा सवाल केला होता.

farmer protest: 8 डिसेंबरला भारत बंदची घोषणा; शेतकऱ्यांचा 'आर या पार'चा निर्धार

राज्यांची भूमिका महत्त्वाची
या बैठकीत मोदी म्हणाले, की ‘‘कोरोनावरील आठ संभाव्य लशींची चाचणी सुरू असून शास्त्रज्ञांनी हिरवा कंदिल दाखविताच लसीकरणाला सुरवात होईल. लसीकरणाच्या खर्चाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. परंतु, लसीचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात असावेत यासाठी राज्यांशी बोलणी सुरू आहे.

मराठा आरक्षणप्रकरणी SC ने दिलेली स्थगिती उठवण्याबाबत घटनापीठाची स्थापना

लस वितरणात राज्यांची भूमिका महत्त्वाची असेल. कोरोना लशीवरील संशोधनाबद्दल मोदी म्हणाले, की संपूर्ण जगाचे लक्ष किफायतशीर आणि सुरक्षित लशीकडे लागले आहे. साहजिकच यासाठी भारतावरही जगाचे लक्ष आहे.  या सर्वपक्षीय बैठकीतून या संभाव्य लशीवर व्यक्त केलेला विश्वास कोरोनाविरोधातील लढाई बळकट करणारा आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणी झाली होती आणि लसीकरणासाठी राज्यांकडून अनेक सूचनाही करण्यात आल्या आहेत.’’

निवडणुका आल्या, घोषणा सुरु; ममता बॅनर्जींकडून विद्यार्थ्यांना मोफत टॅब 

तज्ज्ञांचा समूह स्थापन 
लस वितरणासाठी सरकारने राष्ट्रीयपातळीवरील तज्ज्ञांचा समूह (नॅशनल एक्सपर्ट ग्रुप) तयार केला असून या समूहाच्या शिफारशीनुसार काम होईल, असे सांगताना मोदी म्हणाले, की आतापर्यंतचा भारताचा लसीकरणाचा अनुभव आणि त्यासाठी उपलब्ध असलेली व्यापक यंत्रणा याआधारे केंद्र सरकार कोरोना लस वितरणासाठी राज्य सरकारांच्या मदतीने काम करत आहे.  राज्यांच्या मदतीने लस साठवणीसाठीची शीतगृहे, इतर सहाय्याचा तपशील जाणून घेतला जात आहे. आतापर्यंत आठ लशींची चाचणी टप्प्यात असून येत्या काही आठवड्यांत लसीबाबत खुशखबर मिळण्याची अपेक्षा आहे. शास्त्रज्ञांकडून हिरवा कंदिल मिळताच त्यावर काम सुरू होईल. रुग्णांपर्यंत लस पोहोचेपर्यंतच्या प्रवासावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष प्रकारच्या सॉफ्टवेअर निर्मितीचे काम सुरू असल्याचेही मोदी म्हणाले.

VIDEO: MLC निवडणुकीतील पराभवाने भाजप नेत्यांचा राग अनावर; पोलिसांना केली मारहाण

अफवा पसरवू नका 
लसीकरणाच्या वेळी अफवा पसरू नये यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन मोदींनी केले. ते म्हणाले, की लसीकरणादरम्यान देशविरोधी, मानवता विरोधी अफवा पसरता कामा नये याची काळजी घेतली जावी. तसेच या अफवांपासून सर्वसामान्यांना वाचविण्यासाठी राजकीय पक्षांनी पुढाकार घ्यावा, असे ते म्हणाले. कोरोना मृत्यूदर कमी असलेल्या देशांमध्ये भारताचाही समावेश असल्याचा दावा करताना पंतप्रधानांनी देशाची कोरोनाविरोधातील लढाई ही प्रत्येक नागरिकाच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचे प्रतिक असल्याचे  उद्‌गार त्यांनी काढले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vaccine prevents corona available coming weeks Narendra Modi