हरियाणा: ज्यांना लस त्यांनाच शाळेत एन्ट्री ; आरोग्य मंत्र्यांचे आदेश l Covid 19 Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anil Vij

हरियाणा: ज्यांना लस त्यांनाच शाळेत एन्ट्री ; आरोग्य मंत्र्यांचे आदेश

हरियाणा: हरियाणामध्ये (Haryana)पंधरा ते अठरा वर्षे वयोगटातील मुलांना कोरोनाव्हायरस (Coronavirus)प्रतिबंधक लस घेतल्याशिवाय शाळेत प्रवेश दिला जाणार नाही. ज्यांना लस त्यांनाच प्रवेश अशी भूमिका या राज्यात घेण्यात आली आहे. पालकांनी आपल्या मुलांना कोरोनाची लस घेण्यास प्रोत्साहित करावे असे आवाहन हरियाणाचे गृह आणि आरोग्य मंत्री अनिल विज (Anil Vij) यांनी केले आहे.

हेही वाचा: बालगृहात खळबळ; 4 अल्पवयीन मुलांच्या आरोपानंतर समुपदेशक निलंबित

२६ जानेवारीपर्यंत शाळा बंद

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे हरियाणा सरकारने २६ जानेवारीपर्यंत सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षणमंत्री कंवर पाल यांनी ही घोषणा केली. सुट्टीच्या काळात ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू राहतील असे ही त्यांनी सांगितले. आगामी परीक्षांवर लक्ष केंद्रित करून शाळा आणि महाविद्यालये अभ्यासक्रम सुरु करतील. सध्या मुलांना शाळेत बोलावून कोणताही धोका पत्करता येणार नाही असे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. मार्च महिन्यात या परीक्षा होणार आहेत. यावेळी इयत्ता आठवीची बोर्ड परीक्षा होणार आहे. त्यादृष्टीने शिक्षकांनी ऑनलाइन अभ्यासक्रम पूर्ण करुन मुलांचे मूल्यमापनही करावे. कोरोनाचे रुग्ण वाढल्यास सुट्ट्या वाढवल्या जाऊ शकतात, असेही ते म्हणाले.

लसीकरणात हरियाणा राष्ट्रीय सरासरीच्या पुढे

राज्यातील सर्वाधिक लोकांचे लसीकरण हरियाणात झाले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हरियाणा सरकारने उचललेल्या पावलांचे केंद्र सरकारने कौतुक केले आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांनी आरोग्य संसाधने मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांना पाठवलेल्या निधीचा योग्य वापर केल्याबद्दल हरियाणाचे कौतुक केले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top