बालगृहात खळबळ; 4 अल्पवयीन मुलांच्या आरोपानंतर समुपदेशक निलंबित

लातूर जिल्ह्यातील घटना: अधीक्षकांवर टांगती तलवार
crime news
crime newsesakal

लातूर: लातूर (Latur) जिल्ह्यातील महाराष्ट्र सरकारतर्फे चालवल्या जाणाऱ्या बालसुधारगृहात अल्पवयीन मुलांसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी बालसुधारगृहाच्या समुपदेशकाला निलंबित केले. सूर्यकांत मुंडे असे समुपदेशकाचे नाव आहे. यामुळे परीसरात खळबळ उडाली आहे. याशिवाय बालगृहाचे अधीक्षक रमण तेलगोटे यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार आहे. तसेच या प्रकरणातील अन्य आरोपींवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे उपायुक्तांनी सांगितले. दोन दिवसांच्या लातूर दौऱ्यात महिला व बालकल्याण उपायुक्त हर्षा देशमुख (Child Welfare Harsha Deshmukh)यांनी मुलांची भेट घेतली आहे. त्या म्हणाल्या, 'मी आयुक्तांना अहवाल सादर केला आहे. यानंतर सूर्यकांत मुंडे यांना आयुक्तांनी निलंबित केले आहे. अधीक्षकांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव सचिवांकडे पाठवला आहे. (Children Home in Latur Case)

घृणास्पद कृत्य

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी ७ पैकी ४ मुलांनी विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ही तक्रार गेल्या वर्षी 14 डिसेंबर रोजी दाखल करण्यात आली होती. त्यानंतर या मुलांना दुसऱ्या बालगृहात हलवण्यात आले. बालगृहात राहणाऱ्या काही मुलांनी तेथेच राहणाऱ्या आणखी एका १६ वर्षीय मुलावर घृणास्पद कृत्य केल्याचा आरोप केला आहे.

crime news
Punjab : 4 आमदारांची तिकिटे कापली,बॉलिवूड स्टारच्या बहिणीला संधी

उपायुक्तांनी केली चौकशी

या प्रकरणाची चौकशी महिला व बालकल्याण उपायुक्त हर्षा देशमुख यांनी केली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्या पुण्याहून लातूरला दोन दिवसाच्या दौऱ्यावर गेल्या होत्या. तपासाअंती एक गोपनीय अहवाल विभागाचे आयुक्त राहुल मोरे यांना सादर करण्यात आला असल्याचे हर्षा देशमुख यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com