Vadodara Boat Capsized: नियतीची क्रूर थट्टा! आई-वडिलांना १७ वर्षांनंतर झाली मुलगी; बोट दुर्घटनेत गमावला जीव

नियती किती क्रूर असू शकते हे गुजरातमधील वडोदरा इथल्या कुटुंबाबाबत दिसून आलं आहे.
Vadodara Boat Capsize Incident
Vadodara Boat Capsize Incident

अहमदाबाद : नियती किती क्रूर असू शकते हे गुजरातमधील वडोदरा इथल्या कुटुंबाबाबत दिसून आलं आहे. त्यांच्या चिमुकलीचा शाळेच्या सहलीदरम्यान नौका उलटल्यानं झालेल्या अपघतात मृत्यू झाला. या मुलीच्या जन्मासाठी तिच्या आई-वडिलांना तब्बल १७ वर्षे म्हणजेच जवळपास दोन दशकं वाट पाहावी लागली होती.

पण त्यांचा हा आनंद नियतीनं पुन्हा काढून घेतला. या दुर्घटनेत या चिमुकलीच्या चुलत भावाचा देखील मृत्यू झाला आहे. त्यामुळं इथं व्यक्त होण्यासाठी आता शब्दही फुटणार नाहीत. या दोघा चुलत बहिण-भावावर शनिवारी अत्यंसंस्कार करण्यात आले. (vadodara boat capsized girl born after 17 years of prayers and her cousin also among deaths)

Vadodara Boat Capsize Incident
Owaisi on Ram Mandir: महात्मा गांधींनी राम मंदिराचा उल्लेख...; ओवैसींनी उपस्थित केले अनेक प्रश्न

रहिमा आणि फारुख अशी या चिमुकलीच्या आई-वडिलांची नावं आहेत. लग्नानंतर अनेक प्रयत्नांनंतरही मूल होत नसल्यानं त्यांनी बाळ होण्यासाठी मशिदीत जाऊन अनेकदा प्रार्थनाही केल्या होत्या. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळचं होतं. दोन दिवसांपूर्वी जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा फारुख हे लंडनमध्ये होते. त्याचबरोबर फारुख यांच्या लहान चुलत भाऊ हारुनचा मुलगा होता. त्यांच्या भावंडांमध्ये हा एकमेव मुलगा होता.

Vadodara Boat Capsize Incident
I&B Ministry Advisory: राम मंदिर सोहळ्याबाबतच्या फेक मेसेजपासून सावध राहा! केंद्राची नवी मार्गदर्शक सूचना

काय घडलं वडोदऱ्यात?

वडोदऱ्यातील हरनी भागातील मोटनाथ लेक इथं एका खासगी शाळेची सहल गेली होती. प्राथमिक चौकशीतून या घटनेबाबत एक धक्कादायक बाब समोर आली ती म्हणजे ज्या नौकेतून या विद्यार्थ्यांना तलावात नेलं गेलं. ती नौका ओव्हर लोड होती. म्हणजे या नौकेत १६ जण बसण्याची क्षमता असताना त्यात शिक्षकांसह २७ विद्यार्थ्यांना बसवण्यात आलं. कहर म्हणजे यांपैकी एकालाही लाईफ जॅकेट परिधान करायला दिलं नव्हतं. त्यामुळं या बोटीतील १३ विद्यार्थी आणि दोन शिक्षकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. (Latest Marathi News)

Vadodara Boat Capsize Incident
Kangna Ranaut on Ayodhya: "अयोध्या धाम म्हणजे आपली व्हॅटिकन सिटी"; कंगनानं लोकांना केलंय 'हे' आवाहन

या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी ६ जणांना अटक केली आहे. त्यांच्यावर खूनाचा नव्हे तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या लोकांमध्ये कोटिया प्रकल्पाच्या पार्टनर्सचा समावेश आहे. वडोदरा महापालिकेनं यांच्या कंपनीनकंड हरनी लेक झोनच्या नियोजनाचं कंत्राट दिलं. (Marathi Tajya Batmya)

Vadodara Boat Capsize Incident
Ramlalla Pran Pratishtha: "...तर रामलल्ला सुद्धा खुश होणार नाही"; 'स्मितालय'च्या विद्यार्थीनींना नकोय 22 जानेवारीला सुट्टी

पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख तर जखमींना ५० हजार रुपये तर मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाख तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com