
Valentines Day 2023 : हीर रांझाचे प्रेम! हीरने रांझासाठी विष प्राशन केले, तर रांझानेही प्राण सोडले!
जेव्हा जेव्हा खरे प्रेम करणारे प्रेमी युगुल पाहतो तेव्हा ‘हेच का ते हिर रांझा’ असा प्रश्न पडतो. असेच असेल का त्यांचे प्रेम जे अजरामर झाले. कारण, जेव्हा जेव्हा प्रेमाचा उल्लेख होतो तेव्हा तेव्हा हिर-रांझाचे नाव ओठावर येते.
प्रेमात अडचणी तर सर्वांनाच सहन कराव्या लागतात. त्यांचा सामना करूनच लोकांची प्रेमाची नाव तडिपार होते. आज व्हॅलेंटाईन विकमधील प्रोमिस डे आहे. याच निमित्ताने आज जगप्रसिद्ध असलेली हीर आणि रांझाची कथा काय होती पाहुयात.
भारत पाकिस्तान फाळणी आधीचा काळ. चिनाब नदीच्या किनारी तख्त हजारा नावाचे गाव होते. या गावात रांझा जमातीतील जाट कुटुंबात एका मुलाचा जन्म झाला. या मुलाचे नाव रांझा ठेवले. तीन मोठ्या भावांच्या जन्मानंतर रांझाचा जन्म झाला.
गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती होता. रांझाला बासरी वाजवण्याची आवड होती. काळ लोटेल तसा रांझा मोठा झाला. त्याच्या मोठ्या भावांची लग्न झाली, त्यामूळे वाद वाढले. कौटुंबिक कहल वाढला. या सगळ्याला कंटाळून एके दिवशी रांझा घर सोडून दुसऱ्या गावात काम शोधण्यासाठी गेला.
भटकत तो हीरच्या 'झांग' या प्रांतात पोहोचला. तिथे त्याने हीरला पहिल्यांदा पाहिलं आणि पहिल्याच नजरेत तो प्रेमात पडला. हीर ही सियाल लोकांत जन्मलेली श्रीमंत कुटुंबातील मुलगी होती. रांझाला पाहिल्यावर तीही त्याच्यावर भाळली होती.
रांझा दूर कुठेतरी निघून जाईल या भितीने रांझाने हीरने तिच्या वडिलांकडे त्याला नोकरीला ठेवले. हीर आणि रांझा दोघेही गुप्तपणे भेटू लागले.
असाच बारा वर्षांचा कालावधी लोटला. या काळात हीर आणि रांझा यामध्ये प्रेमकथेत विभक्तीची भर पडली जेव्हा हीरचे लग्न सईदा खेडाशी झाले होते. रांझा हा वियोग सहन करू शकला नाही तो दीक्षा घेऊन तो संन्यासी झाला.
तो हीरपासून विभक्त होऊन भटकत राहिला. एके दिवशी त्याचे नशीब त्याला हीरच्या सासरी घेऊन गेले. येथे त्याला समजले की हीरने विष प्राशन करून आत्महत्या केलीय. तेव्हा रांझेनेही तिच्या वियोगात मृत्यूला कवटाळले. आणि या प्रेमकहाणीचा शेवट झाला.