Promise Day : IAS होण्यासाठी गर्लफ्रेंडनं केलं सपोर्ट; देशात पहिला आलेल्या कनिष्कची कहाणी

Couple
Couple

Valentine Special : पुणे : ७ फेब्रुवारीपासून व्हेलेंटाईन वीकला सुरवात झाली आहे. खास करून तरुण-तरुणींसाठी हा आठवडा खास असतो. असे लोक खूप कमी आहेत, जे करिअर आणि प्रेम या दोन गोष्टी एकत्रित हाताळतात आणि तरीही ते आपले ध्येय गाठण्यात यशस्वी होतात. 

याच पार्श्वभूमीवर आपण २०१९चा यूपीएससी टॉपर कनिष्क कटारियाबद्दल जाणून घेऊया. जर एखाद्या खास व्यक्तीची तुम्हाला सोबत मिळाली, तर तुम्ही कोणतेही ध्येय साध्य करू शकता, हे त्यानं सिद्ध करून दाखवलं. 

आयआयटी बॉम्बेमधून बीटेक पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या कनिष्क कटारिया यूपीएससी २०१८-१९ साली घेण्यात आलेल्या यूपीएससीच्या परीक्षेत देशात पहिला आला होता. कोरियामधील कोट्यवधी रुपयांचे पॅकेज असणाऱ्या नोकरीवर पाणी सोडत त्याने यूपीएससी परीक्षा देण्याचे ठरवले.

एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना कनिष्क म्हणाला होता की, हा क्षण खूप खास आहे, मी यूपीएससीच्या फायनल लिस्टमध्ये येईन, पण देशात पहिला येईन हे मला अनपेक्षित होते. मला मिळालेल्या यशात माझे आई-वडील, बहीण आणि माझी मैत्रीण या चार व्यक्तींचा वाटा आहे. 

कनिष्कने मुलाखतीमध्ये जेव्हा त्याच्या मैत्रिणीचा उल्लेख केला तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले. कारण खूप कमी लोक असे आहेत, ज्यांनी आपल्याला मिळालेल्या यशात मित्र-मैत्रिणी अशा खास व्यक्तींचा उल्लेख केला आहे. परीक्षेच्या तयारीदरम्यान माझ्या मैत्रिणीचा खूप पाठिंबा मिळाला. मी भारतात यूपीएससीची तयारी करत असताना ती जपानमध्ये होती. आमच्यात लाँग डिस्टन्स रिलेशनशिप होती, पण असे असतानाही तिचे खूप सहकार्य मला मिळाले, असे कनिष्कने स्पष्ट केले. 

कनिष्कचे वडीलही आयएएस अधिकारी आहेत. यूपीएससीमध्ये यश मिळविण्याआधी कनिष्कने जेईई परीक्षेतही धमाकेदार यश मिळवले होते. तसेच आयआयटी मुंबईमधून कॉम्प्युटर इंजिनीअरिंगची पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com