Varanasi Airport Upgrade: वाराणसी विमानतळावर लंडन-दुबईसारखी हायटेक सुरक्षा; बायोमेट्रिक कॅमेरे, फेस रिकग्निशन अन् AI ची नजर

वाराणसी विमानतळावर हीथ्रो-दुबईच्या धर्तीवर स्मार्ट सर्व्हिलन्स, बायोमेट्रिक ओळख, फेस रिकग्निशन व AI आधारित निगराणी; कमी मनुष्यबळात अधिक कडक सुरक्षा व्यवस्था उभारण्याची तयारी
Varanasi airport set to adopt advanced AI-powered security with biometric cameras, facial recognition, smart gates and contactless screening inspired by global airports.

Varanasi airport set to adopt advanced AI-powered security with biometric cameras, facial recognition, smart gates and contactless screening inspired by global airports.

Sakal

Updated on

वाराणसी (उत्तर प्रदेश): लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारासोबतच येथील सुरक्षा व्यवस्थेतही मोठे बदल करण्यात येणार आहेत. नव्या आणि विस्तारित विमानतळ परिसरात लंडनच्या हिथ्रो आणि दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धर्तीवर स्मार्ट सर्व्हिलन्स, ऑटोमेटेड स्क्रीनिंग, बायोमेट्रिक ओळख, डिजिटल अ‍ॅक्सेस कंट्रोल आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित निगराणी व्यवस्था उभारण्यात येणार आहे. नव्या सुरक्षा व्यवस्थेमुळे कमी मनुष्यबळात अधिक प्रभावी देखरेख करणे शक्य होणार असून संशयास्पद हालचाली तात्काळ ओळखता येणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com