Varanasi Dolphin: गंगेच्या लाटांमध्ये दिसणार दुर्मिळ डॉल्फिन; वाराणसीत 'डॉल्फिन सफारी'ला पर्यटकांची पसंती

वाराणसीत गंगेच्या स्वच्छ, खोल पाण्यात गंगेटिक डॉल्फिन्सचा थरारक अनुभव; ढकवा-कैथी परिसरात पर्यावरणपूरक डॉल्फिन सफारीमुळे नवे पर्यटन केंद्र विकसित
A rare Gangetic dolphin surfaces in the waters of the Ganga during a dolphin safari near Varanasi.

A rare Gangetic dolphin surfaces in the waters of the Ganga during a dolphin safari near Varanasi.

Sakal

Updated on

गंगेच्या स्वच्छ आणि खोल पाण्यात मुक्तपणे वावरणाऱ्या दुर्मिळ गंगेटिक डॉल्फिन्सचा थरारक अनुभव घेण्यासाठी वाराणसीतील ढकवा आणि कैथी या गावांकडे पर्यटकांची पावले वळू लागली आहेत. शांत नदी, पारंपरिक चप्पूच्या बोटी आणि अगदी जवळून दिसणाऱ्या डॉल्फिन्स यामुळे या भागात हळूहळू एक वेगळे पर्यटन केंद्र विकसित होत आहे.

वाइल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (WII) आकडेवारीनुसार, कानपूर बॅरेज ते चुनार या गंगा नदीच्या पट्ट्यात देशातील सर्वाधिक डॉल्फिन्स आढळतात. त्यामुळे वाराणसी परिसरातील डॉल्फिन सफारीला पर्यावरणपूरक पर्यटनाचा नवा आयाम मिळाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com