पीडितेने आई-वडिलांसह घेतले विष; प्रियांका म्हणाल्या, मुख्यमंत्री लाज बाळगा

वृत्तसंस्था
Tuesday, 24 December 2019

वाराणसीत एका तरुणीवर बलात्कार झाला होता. या प्रकरणानंतर तिने पोलिस चौकीत तक्रार दाखल केली आहे. मात्र, अद्याप कोणतीच कारवाई न झाल्याने तिने स्वतःसह आई-वडिलांनाही विष देऊन आत्महत्येचा प्रय़त्न केला.

वाराणसी : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे बलात्कार पीडितेने आपल्या आई-वडिलांनाही विष दिल्याची खळबळजनक घटना घडली असून, तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. यावरून काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी ट्विट करत मंत्र्यांना लाज बाळगा असे म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वाराणसीत एका तरुणीवर बलात्कार झाला होता. या प्रकरणानंतर तिने पोलिस चौकीत तक्रार दाखल केली आहे. मात्र, अद्याप कोणतीच कारवाई न झाल्याने तिने स्वतःसह आई-वडिलांनाही विष देऊन आत्महत्येचा प्रय़त्न केला. या तिघांवरही रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिघांचीही प्रकृती चिंताजनक आहे.

CAA विरोधात आंदोलन केल्याने 'या' विद्यार्थ्याला देश सोडण्याचे आदेश

याविषयी प्रियांका गांधी यांनी ट्विट करत उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीका केली आहे. त्या म्हणाल्या, की उत्तर प्रदेशातील परिस्थिती पाहा. शेकडो भयानक घटना घडूनही महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारकडून कोणतीच पाऊले उचलली जात नाहीत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना लाज वाटली पाहिजे. कोणत्या गोष्टींची हे वाट पाहत आहेत. महिलांना न्यायाचा विश्वास तुम्ही देऊ शकत नाही. 

'जे शत्रूला जमलं नाही ते मोदी करतायत'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Varanasi Gangrape victim Yogi Government Congress Priyanka Gandhi tweet